जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / स्वातंत्र्याचा पहिला हुंकार जिथे उमटला 'त्या' पवित्र ठिकाणी पोहचला सुबोध भावे, फोटो शेअर करत म्हणाला..

स्वातंत्र्याचा पहिला हुंकार जिथे उमटला 'त्या' पवित्र ठिकाणी पोहचला सुबोध भावे, फोटो शेअर करत म्हणाला..

गुरुपौर्णिमेला सुबोध भावे राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी सिंदखेडराजाला

गुरुपौर्णिमेला सुबोध भावे राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी सिंदखेडराजाला

सुबोध भावेने आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने राजमाता जिजाऊंचं जन्मस्थान सिंदखेडराजाला भेट दिली. सुबोध भावेने यानिमित्ताने सोशल मिडीयावर खास पोस्ट केली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 3 जुलै- गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुंची पूजा केली जाते. गुरुपौर्णिमेचा सण आपल्या जीवनातील गुरुचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी लोक आपल्या गुरूंना भेटवस्तू देतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. ज्यांचे गुरू आता या जगात नाहीत तेही गुरूंच्या चरणांची पूजा करतात. सुबोध भावेने आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने राजमाता जिजाऊंचं जन्मस्थान सिंदखेडराजाला भेट दिली. सुबोध भावेने यानिमित्ताने सोशल मिडीयावर खास पोस्ट केली आहे. सुबोध भावेने जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेडराजाला भेट दिली. सुबोधने जिजाऊ जन्मस्थानाचे फोटो शेअर करत म्हटलं आहे की, आज गुरूपौर्णिमा, राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थानी म्हणजे सिंदखेडराजा येथे त्यांचा जन्म झाला त्या वास्तूला भेट देण्याचा योग आला. वाचा- अमिताभ बच्चन यांचे सहकलाकर हरीश मॅगन यांचं निधन; ‘या’ सिनेमांत केलंय काम स्वातंत्र्याचा पहिला हुंकार जिथे उमटला त्या पवित्र वास्तूच आणि आई जिजाऊं यांचे आशिर्वाद घेता आले. आई जिजाऊ आणि कळत-नकळत संस्कार करणार्‍या सर्व गुरूंना मनापासून वंदन आणि साष्टांग नमस्कार, अशी पोस्ट त्याने केली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान सुबोध भावेच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. गुरूपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा! अशा कमेंट करत सुबोधला शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी सर आमच्या जिल्ह्यात स्वागत आहे तुमचं, अशी कमेंट केली आहे.

जाहिरात

सुबोधनं हर हर महादेव’ या चित्रपटात सुबोधने छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली होती. पण हा सिनेमा प्रदर्शित होताच वादात सापडला. या संपूर्ण वादानंतर सुबोधने यापुढे कुठलीही ऐतिहासिक भूमिका करणार नसल्याचं सांगितलं होतं.‘मरेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम करणार. परंतु, पण इथून पुढे कोणत्याही ऐतिहासिक सिनेमात कोणाचीही भूमिका बापजन्मात करणार नाही. सध्या मी एक बायोपिक करतोय. त्याचं शूटींग सुरू आहे. शूटींग सुरू असलेला हा माझा शेवटचा बायोपिक सिनेमा असेल, असे सुबोध भावेनं त्यावेळी सांगितलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात