मुंबई, 10 जुलै- नुकताच माधुरीने (Madhuri Dixit) अभिनेता अनिल कपूरसोबत एक सुंदर रील बनवला होता. त्यांनतर आत्ता माधुरीचा एक नवा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतं आहे. माधुरीने दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत (Rohit Shetty) हा नवा रील बनवला आहे. हा व्हिडीओ खुपचं मजेशीर आहे. माधुरी आणि रोहितने सिंघमच्या टायटल सॉंगवर हा रील बनवला आहे.
View this post on Instagram
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित पन्नाशीतही तितकीच सुंदर आणि ऍक्टीव्ह आहे. ती सोशल मीडियावरसुद्धा खुपचं सक्रीय असते,. सतत डान्स व्हिडीओ, मजेशीर रील्स किंवा सुंदर फोटो शेयर करून चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. नुकताच माधुरीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक मजेशीर रील्स शेयर केला आहे. यामध्ये ती रोहित शेट्टीसोबत दिसून येत आहे. रोहित शेट्टीच्या सुपरहिट ‘सिंघम’ च्या टायटल सॉंगवर हा रील बनवला आहे. यामध्ये रोहित एका तरुणाला मुक्का मारत असतो. मात्र इतक्यात माधुरी जवळ येते. आणि रोहितला बाजूला करते व फक्त आपल्या ठुमक्याने त्याला दूर फेकते. असा हा मजेशीर रील आहे.
(हे वाचा: VIDEO: 'तुमची सई चोर आहे'; मृण्मयीने बहिणीवर केला गंभीर आरोप )
हा व्हिडीओ ‘डान्स दिवाने 3’ च्या सेटवरील आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित यामध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहे. तर रोहित शेट्टी या कार्यक्रमामध्ये पाहुणा म्हणून पोहोचला होता. या भागामध्ये मोठी धम्माल सर्वांना पाहायला मिळणार आहे. फक्त माधुरी आणि रोहितचं नव्हे, तर भारती आणि हर्षचीसुद्धा यामध्ये भन्नाट मजामस्ती दिसणार आहे. सध्या माधुरी आणि रोहितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे. चाहते मोठ्या प्रमणात या व्हिडीओला लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. रोहित लवकरच ‘खातरों के खिलाडी’ हा शो घेऊन येत आहे. यानिमित्ताने त्याने ‘डान्स दिवाने’ मध्ये हजेरी लावली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Madhuri dixit, Rohit Shetty