मुंबई, 20 डिसेंबर : छोट्या पडद्यावरील ‘देवों के देव महादेव’ मालिकेत भगवान शंकरांची भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजे मोहित रैना. मोहितने साकारलेली भगवान शंकराची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यानंतर मोहितने ‘उरी; द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटातील भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. मोहित रैनाच्या खासगी आयुष्याबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अभिनेत्याच्या वैवाहिक आयुष्यात सर्व काही ठीक नसल्याचं बोललं जात आहे. मोहितने काही महिन्यांपूर्वीच लग्नगाठ बांधली होती. मात्र आता वर्षभरातच त्याच्या खाजगी आयुष्यात मोठं वादळ आलं आहे. मोहित हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सतत चाहत्यांसोबत पत्नीसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करायचा. त्याने लग्नाचे सुद्धा अनेक फोटो ओशाळ मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले होते. पण आता अचानक मोहितने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील पत्नीसोबतचे फोटो डिलिट केले आहेत. त्यामुळे आता ही जोडी विभक्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. हेही वाचा - Tejaswini Pandit: धक्कादायक! पुण्याच्या नगरसेवकाची तेजस्विनीकडे घाणेरडी मागणी; अभिनेत्रीचा गौप्यस्फोट मोहितने १ जानेवारी २०२२ रोजी अदिती शर्माशी लग्नगाठ बांधली होती. त्याने सोशल मीडियावर लग्नातील फोटो शेअर करत चाहत्यांना हा सुखद धक्का दिला होता. त्यानंतर त्याने होळी साजरी करतानाचे फोटो देखील पोस्ट केले होते. आता त्याने पत्नीसोबतचे सगळे फोटो डिलिट केले आहेत. केवळ १ जून रोजी पोस्ट केलेला फोटो ठेवला आहे. या फोटोमध्ये मोहितने अदितीला खांद्यावर उचलून घेतलं आहे.
या फोटोवर कमेंट करताना एका युजरने लिहिलं, ‘तुम्ही दोघं एकत्र फोटो का पोस्ट करत नाही. मी पाहिलं आहे की तुम्ही एकमेकांना सोशल मीडियावर फॉलो करत नाही आणि लग्नाचे फोटोही डिलिट केले आहेत. काहीतरी बिनसलंय.’ अर्थात सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चांवर मोहित किंवा अदितीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान मोहित रैनाने लग्नानंतर दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की तो एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून अदितीला भेटला होता. मोहितनेच अदितीला प्रपोज केलं होतं. त्यानंतर काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केलं होतं. आता या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चेने त्याचे चाहते सध्या चिंतेत आहेत. मोहितने ‘देवों के देव.. महादेव’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली होती. या मालिकेने त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले होते. त्यानंतर त्याने उरी: द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटातही भूमिका साकारली. शिवाय त्याने काही वेब सीरिजमध्ये देखील काम केले. ‘काफीर’, ‘भौकाल’, ‘मुंबई डायरीज 26/11’ या वेब सीरिजमध्ये तो दिसला होता.