जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: ललितचं लग्न जमता जमता राहिलं! मुलीनं केलं असं काही की उडाली अभिनेत्याची झोप

VIDEO: ललितचं लग्न जमता जमता राहिलं! मुलीनं केलं असं काही की उडाली अभिनेत्याची झोप

VIDEO: ललितचं लग्न जमता जमता राहिलं! मुलीनं केलं असं काही की उडाली अभिनेत्याची झोप

अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) एवढा चार्मिंग आणि क्युट मुलगा असूनही नेमका सिंगल आहे का हा प्रश्न अनेक चाहत्यांना आहे. मात्र त्याच्या लगनबद्दल एक मोठा खुलासा ललितने केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 21 जून: अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) सध्या मिडीयम स्पायसी चित्रपटातून एका हँडसम शेफच्या भूमिकेत दिसतो आहे. ललितच्या या हँडसम लुक आणि अदांवर अनेक महिला चाहत्या फिदा आहेत. एवढा गुणी, गोड हसू असणारा, मितभाषी, मनमिळाऊ मुलगा अजूनही सिंगल कसा हा तर अनेकांना पडलेला प्रश्न आहे. याबद्दल एक मोठा खुलासा ललितने एका व्हिडिओमध्ये केला आहे. त्याचं लग्न ठरलं होत (Is Lalit Prabhakar Single) पण नेमकं काय झालं आणि तो अजूनही सिंगल आहे पाहूया. ललित एक चार्मिंग मुलगा आहे. त्याच्या अभिनय कौशल्यावर सुद्धा चाहते फिदा आहे. अनेकांच्या स्वप्नात येऊन त्यांची झोप उडवणाऱ्या या अभिनेत्याचं (Lalit Prabhakar relationship status) रिलेशनशिप स्टेट्स नेमकं काय आहे यावर सध्या बरीच चर्चा आहे. ललितच्या एका व्हिडिओची सध्या बरीच चर्चा होते आहे ज्यात त्याच लग्न ठरलं असं कळत आहे. अनेकजणी जिथे ललितच्या एका होकारावर बोहल्यावर चढायला तयार आहे त्यांचा हार्टब्रेक होणार का अशी चिन्ह समोर येत आहेत. पण घाबरायचं कारण नाही कारण हा प्रमोशनसाठी केलेला एक भाग आहे. ललिताचा ‘मिडीयम स्पायसी’ चित्रपट नुकताच रिलीज झालाय. त्याच्या प्रमोशनसाठी त्याने एका RJ सोबत एक धमाल कॉमेडी रील केलं जे तुफान viral होताना दिसत आहे. त्यात तो असं म्हणतो, “माझं लग्न ठरणारच होतं पण आतून तिचा आवाज आला की चहाला किती शिट्ट्या करू आई?” या धमाल विनोदी रील नंतर सगळीकडे तमाम मुलींनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तर बऱ्याच लोकांनी हसतहसत डोक्याला हात लावला आहे.

जाहिरात

या प्रश्नाने ललिताची सुद्धा वाट लागली असणार हे रीलमध्ये दिसत आहे. अशा प्रश्नाला नेमकं काय उत्तर द्यावं याच गोंधळात तो सापडला आहे. हे ही वाचा-  दोस्तीसाठी व्हावं लागतं Zomatoअन् Swiggy! अक्षयासाठी मैत्रिणींनी डिलिव्हर केला ‘हा’ खास पदार्थ ललितच्या रिलेशनशिप स्टेट्समध्ये अनेकजणींना बराच रस आहे हे आता जगजाहीर आहे. ललित अजूनतरी सिंगल असला तरी तो कोणाला डेट करण्यात कितपत उत्साही आहे हे वेळ आल्यावर कळेलच. वर्क फ्रंटवर मात्र त्याचा हा उत्साह वाढतच जाताना दिसत आहे. येत्या काळात ललिताचे सनी, कलरफुल असे प्रोजेक्ट प्रेक्षकांसमोर येताना दिसतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात