Home /News /entertainment /

Devmanus 2: 'एक-दोन नाही 38 खून मीच केले'; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

Devmanus 2: 'एक-दोन नाही 38 खून मीच केले'; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

(devmanus 2) देवमाणूस 2 या मालिकेत सध्या डॉक्टरांची नवी खेळी समोर आली असून जामकरांकडे जाऊन त्यांनी धक्कादायक कबुली दिली आहे.

  मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर यांच्यातली जवळीक वाढत असताना डॉ. अजितकुमारने (Dr. Ajitkumar) जाऊन जामकरांकडे धक्कादायक कबुली दिल्याचं कळत आहे. अभिनेता मिलिंद शिंदे यांनी डॅशिंग पोलीस इन्स्पेक्टर मार्तंड जामकर या भूमिकेत एंट्री घेऊन मालिकेची लोकप्रियता आणखी वाढवली आहे. इतके दिवस डॉक्टरांवर संशय असणाऱ्या मार्तंडकडे येऊन डॉक्टर बेधडकपणे खुलासा करताना पाहायला मिळत आहे. या मालिकेचा दुसरा भाग सुद्धा प्रेक्षकांकडून बराच पसंत केला जात आहे. अजितकुमारचा डाव अजूनतरी लक्षात आला नसला तरी मार्तंड नेहमीच त्याच्या मागावर असल्याचं मालिकेत पाहायला मिळत. या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये अजितकुमार त्याने केलेल्या (Devmanus 2 latest update) खुनांची कबुली देताना दिसत आहे. या नव्या प्रोमोमध्ये जामकर अजितकुमार आणि डिम्पल यांना पोलीस स्टेशनला येऊन जायचा निरोप ठेऊन जातो तर डॉक्टर हा आमदार बाईंच्या मिरवणुकीत नाचताना दिसतो अशी खबर जामकरांना एक माणूस देतो. डॉक्टर स्वतःहून जामकरांच्या दारात येऊन स्वतःच्या खुनांची कबुली देताना दिसतो. “हे जेवढे खून आहेत ते मीच केलेत, एक नाही, दोन नाही, चार नाही तर अडतीस… काय करायचं ते करा” अशा शब्दात अप्रत्यक्षपणे अजितकुमार जामकरांना धमकी देतो असं पाहायला मिळत आहे. यावर आता जामकरांचं पुढचं पाऊल काय असणार आणि ते डॉक्टरला गुन्हेगार कसं सिद्ध करणार हे पाहून रंजक ठरणार आहे. हे ही वाचा- अजितकुमार आणि डिंपलमध्ये वाढतेय जवळीक, होणार अर्थाचा अनर्थ? काय घडणार येत्या भागात?
  सध्या मालिकेत एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर यांची जवळीक वाढताना दिसत आहे. डॉक्टरांशी केवळ समाजाला दाखवायला म्हणून केलेलं खोटं लग्न डिम्पलच्या अंगाशी येणार असं दिसत आहे. डिम्पल आणि डॉक्टर यांच्यात वाढती जवळीक तिला डॉक्टरची पुढची शिकार बनवणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल.
  देवमाणूसच्या दुसऱ्या भागाने प्रेक्षकांची काहीशी निराशा केली असल्याने मालिकेचा शेवट जवळ आला का अशी शंका वर्तवली जात आहे. या मालिकेचा पहिला भाग प्रचंड गाजला होता. नुकतीच या मालिकेत हवा येऊ द्या फेम अभिनेत्रीची एंट्री सुद्धा झाली आहे.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial

  पुढील बातम्या