मुंबई, 06 जुलै: झी मराठीच्या ‘देवमाणूस 2’ ( Devmanus 2) या मालिकेत खूप ट्विस्ट आणि टर्नस प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. अभिनेते मिलिंद शिंदे ( Milind Shinde) मालिकेत मार्तंड जामकर या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहेत. त्यांच्या एन्ट्रीनंतर ही मालिका नव्यानं चर्चेत आली आहे. अजित कुमारला ( Dr. Ajitkumar Deo) नेहमीच साथ देणारी डिंपलचं आता त्याचं पुढचं सावज झाल्याचं पाहायला मिळत आहे. लोकांना दाखवण्यासाठी केलेलं खोट लग्न आता डिंपलच्या जीवावर बेतण्याची शक्यता वाटत आहे. खरंतर डिंपल आणि डॉक्टर यांच्यात केवळ मैत्री आहे असं त्यांनी वारंवार म्हटलं आहे. मात्र डॉक्टर आता डिंपलला प्रेमाच्या जाळ्यात ओढणार का असं दिसत आहे. मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये डिंपल आणि अजितकुमार यांच्यात जवळीक वाढत असल्याचं पाहायला मिळणार आहे. झी मराठीने नवीन प्रदर्शित केलेल्या प्रोमोनुसार डिंपल नशेत असताना पैसे उडवत असते तेव्हा तिचा तोल जातो पण तेवढ्यात डॉक्टर अजित तिला सावरतो. दोघांमध्ये जवळीक प्रचंड वाढल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. पैशांच्या नोटांवर दोघे एकमेकांच्या प्रेमाच बुडाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता पुढे काय घडेल याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता मालिकेत एक नवा ट्रॅक बघायला मिळणार आहे हे निश्चित झालं आहे.
हेही वाचा - आमचं पप्पा! वहिनीसाहेबांचा कोल्हापुरी ठसका, धनश्री काडगावकरचा बेस्ट VIDEO एकदा पाहाच नुकतीच देवमाणूस 2 मध्ये चला होऊ द्या फेम स्नेहल शिदमची ( Snehal Shidam) मार्तंड जामकरची पत्नी म्हणून एन्ट्री झाली आहे. ‘चला हवा येऊ द्या’ची ब्लॅक ब्युटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्नेहलच्या एन्ट्रीनं मालिकेत नेमका काय ट्वीस्ट येणार हे पाहणं रंजक ठरेल. सध्या ‘देवमाणूस 2’ मालिकेचा टीआरपी कमी झाल्याने लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार अशीही चर्चा सुरू झाली आहे. सध्या सुरू असलेलं कथानक बघता, मालिकेचा शेवट जवळ आल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याआधीही अशा चर्चा रंगल्या. पण ‘देवमाणूस 2’ अद्यापही सुरू आहे. देवमाणूस ( Devmanus ) ही मालिका तुफान गाजली होती. मालिका इतकी लोकप्रिय झाली होती की लगेच याचा दुसरा सीझन आला. अर्थात दुसऱ्या सीझननं प्रेक्षकांची निराशा केली. पहिल्या सीझन इतका हा सीझन गाजताना दिसला नाही. पण अधुनमधून मालिकेची चर्चा मात्र होत असते. सध्या चर्चा आहे ती ‘देवमाणूस 2’ ( Devmanus 2) या मालिकेत नवीन येणाऱ्या ट्विस्टची. हा ट्विस्ट असा आहे की, डॉ. अजितकुमार देव आणि डिंपल यांच्यात जवळीक वाढतेय. पण हे खरंच घडेल की ही डॉक्टर अजितची नवीन खेळी आहे हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

)







