मुंबई, 4 ऑगस्ट: गाण असो किंवा एखादी राजकीय टिप्पणी प्रत्येक ठिकाणी आपली वेगळी ओळख आणि छाप पाडणाऱ्या अमृता फडणवीस. एक बँकर ते राजकारण्याची पत्नी ते आता एक आपल्या गायन कौशल्यामुळे प्रसिद्ध झालेल्या अमृता फडणवीस प्रत्येक वेळी मनमोकळेपणाने व्यक्त होत असतात. अमृता फडणवीसांनी केलेली कोणतीही टिप्पणी आणि वक्तव्य नेहमीच चर्चेत येत असतात. अमृता फडणवीस नुकत्याच झी मराठीवरील बस बाई बस या नव्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून सहभागी झाल्या होत्या. बस बाई बस मध्ये अभिनेता सुबोध भावेच्या प्रश्नांवर अमृता फडणवीसांनी दमदार उत्तरं दिली. त्यांना अनेक मजेशीर प्रश्नांची भन्नाट उत्तर दिली. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर लग्न होण्याआधीच्या अमृता आणि लग्ना झाल्यानंतरच्या अमृता या दोघींमध्ये जमीन आसमानचा फरक झालेला पाहायला मिळाला आहे. अमृता यांनी सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यांची प्लास्टिक सर्जरी केलीय असंही अनेकदा म्हणण्यात आलं आहे. यावरुन अमृता यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करण्यात आलंय. दरम्यान बस बाई बसमध्ये सहभागी झालेल्या अमृता फडणवीसांना याविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर भन्नाट उत्तर दिलं. हेही वाचा - Bus Bai Bus: बधूं सारो छे! मराठी टीव्हीवर फाडफाड गुजराती बोलत सुप्रिया सुळेंनी मोदींशी साधला संवाद, पाहा VIDEO मॅडम तुम्ही चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी केली आहे का ओ? असा प्रश्न विचारल्यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘चांगलं झालं तुम्ही मला हा प्रश्न विचारला. यावरुन मला खूप लोकांनी ट्रोल केलं आहे. प्लास्टिक सर्जरी एक हिंमतीची गोष्ट आहे. त्यात काही बिघडलं तर तुमच्या चेहऱ्याचे सगळे फिचर्स बिघडू शकतात. प्लॅस्टिक सर्जरी ही महागडी गोष्ट आहे. त्यामुळे धोकाही असतो’, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.
अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या, ‘मी लग्नाआधी एकदाही ब्यूटी पार्लमध्ये गेली नाही. लग्नाच्या वेळी जो मेकअप करताता तो मी केला होता. देवेंद्र जींबरोबर माझं लग्न झालं. देवेंद्र जींसाठी माझा चेहरा महत्त्वाचा नाही. ते स्त्रीचा चेहरा पाहत नाहीत तर तिचं मन पाहतात’.अमृता फडणवीसांच्या या वक्तव्यावर सर्वांनी त्यांचं कौतुक करत टाळ्या वाजवल्या. अशाप्रकारे प्लॅस्टिक सर्जरीवर अमृता फडणवीस यांनी दमदार उत्तरं तर दिली. त्याशिवाय त्या गळ्यात मंगळसूत्र का घालत नाही, या प्रश्नावर देखील त्यांनी भन्नाट उत्तर दिलीत. तसेच बस बाई बसच्या प्रवासात त्यांच्याबरोबर आता कोण कोण प्रवासी येणार आहेत ते देखल पाहणं मजेशीर ठरणार आहे. येत्या शुक्रवार आणि शनिवारी रात्री 9:30 वाजता बस बाई बसमध्ये अमृता फडणवीसांचा स्पेशल एपिसोड पाहायला मिळेल.