जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Devendra Fadnavis : नागपूर प्रवासात उपमुख्यमंत्र्यांना भेटले खास कलाकार; तोंडभरून केलं कौतुक

Devendra Fadnavis : नागपूर प्रवासात उपमुख्यमंत्र्यांना भेटले खास कलाकार; तोंडभरून केलं कौतुक

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारणात जितके मातब्बर आहेत तेवढेच कलाप्रिय आहेत हे आता सिद्ध झालं आहे. कारण नुकतच त्यांनी महाष्ट्राच्या लाडक्या कलाकारांच कौतुक केलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 ऑगस्ट : देवेंद्र फडणवीस हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात आणि भाजपच्या वर्तुळात नेहमीच एक अभ्यासू नेता म्हणून ओळखीचं असलेलं पाहायला मिळतं. देवेंद्र फडणवीस सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारणात जितके मातब्बर आहेत तेवढेच कलाप्रिय आहेत हे आता सिद्ध झालं आहे. कारण नुकतच त्यांनी महाराष्ट्राच्या लाडक्या कलाकारांच कौतुक केलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी नुकतीच महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या कलाकारांशी भेट झाली. योगायोग म्हणजे हे कलाकार आणि उपमुख्यमंत्री एकाच विमानाने प्रवास करणार होते. मुंबई ते नागपूर असा प्रवास करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी या टीमची भेट घेतली. सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा असणारा हा कार्यक्रम आणि यातील कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या कार्यक्रमात सादरीकरण केले जाणारे प्रत्येक स्किट हे महाराष्ट्रातील सामान्यांच्या घरातील एखादा प्रसंग असावा इतक्या सहजपणे सादर केले जाते. नुकताच या कार्यक्रमाचा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आणि या सीझनलाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. पण या कार्यक्रमाचे आणि कलाकारांचे चाहते फक्त सामान्य लोकच नाही तर प्रसिद्ध राजकारणी देखील आहेत हे आता स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच एक ट्विट केलं आहे त्यावरून ते हा कार्यक्रम आवर्जून पाहतात आणि या कलाकारांचे चाहते आहेत हे आता स्पष्ट झालं आहे. हेही वाचा - Shivlila patil : शिवलीला पाटील यांच्या घरी एक नव्हे दोन नव्या फॅमिली मेंबरचं आगमन; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राची हास्यजत्राचे लेखक आणि प्रसिद्ध अभिनेते समीर चौगुले आणि इतर सहकलाकारांची  भेट घेतली. या भेटीत देवेंद्र फडणवीसांनी समीर चौगुले यांच्याशी चर्चा केली तसेच हास्यजत्रा या कार्यक्रमाचा आढावाही घेतला. त्याशिवाय मुंबई ते नागपूर प्रवासादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हास्यजत्राच्या टीमचं तोंडभरुन कौतुकही केलं. त्याबद्दलचं एक ट्विटही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे कि, ‘हास्य अभिनेते आणि लेखक समीर चौगुले व टीम महाराष्ट्राची हास्य जत्रा यांची आज मुंबई ते नागपूर प्रवासादरम्यान भेट झाली. आपल्याला खळखळून हसविणाऱ्यांची भेट ही सदा आनंददायीच असते.’

जाहिरात

देवेंद्र फडणवीस यांना विनोदाची जाण आहे. राजकीय क्षेत्रात वावरत असताना आपल्या विरोधकांवर टीकेचे बाण सो़डताना कधीकधी फडणवीस विनोदी अंगानेही विरोधकांची खिल्ली उडवत असतात हेही आपण पाहिल आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या कौतुकामुळे समीर चौगुले आणि सहकलाकारांचा आनंद गगनात मावेनासा झाला असेल यात शंका नाही. टेन्शन विसरण्यासाठी आणि मनमुराद हसण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’- चार वार हास्याचा चौकार’ हा कार्यक्रम 15 ऑगस्टपासून सुरु झाला आहे. हा कार्यक्रम तुम्ही सोमवार ते गुरुवार रात्री 9 वा. सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षक पाहू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात