मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Sushant Singh Rajput वरील चित्रपटांना स्थगिती नाही, वडिलांची याचिका कोर्टानं फेटाळली

Sushant Singh Rajput वरील चित्रपटांना स्थगिती नाही, वडिलांची याचिका कोर्टानं फेटाळली

Sushant singh rajpoot suicide - सुशांतचे वडील कृष्ण किशोर सिंह यांनी दिल्‍ली हायकोर्टात याचिका दाखल करून मुलाच्या जीवनावर आधारित बनत असलेल्या चित्रपटात किंवा कोणत्याही दुसऱ्या चित्रपटात त्याच्या नावाच्या किंवा त्याच्याशी मिळतं जुळतं पात्र वापरण्यावर स्थगिती लावण्याची मागणी केली होती.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 10 जून : दिल्‍ली हायकोर्टानं (Delhi High Court) दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) चे वडील कृष्ण किशोर सिंह यांची एक महत्त्वाची याचिका फेटाळली आहे. सुशांतच्या वडिलांनी हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती. त्यात सुशांतच्या जीवनावर आधारित किंवा त्याचया जीवनाशी साधर्म्य असलेल्या विविध प्रस्तावित चित्रपटांवर स्थगिती आणण्याची मागणी केली होती. पण न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेली याचिका फेटाळल आहे.

(वाचा-सुशांत कोणत्याचं ऑडिशनमध्ये झाला नव्हता अपयशी; मुकेश छाबरांचा VIDEO होतोय VIRAL)

ही याचिका फेटाळण्याबरोबरच दिल्ली हायकोर्टानं ‘न्याय : द जस्टीस’या चित्रपटाच्या प्रदर्शनावरही स्थगिती लावण्यास नकार दिला आहे. हा चित्रपट दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या जीवनावर आधारित असल्याची चर्चा आहे. याच शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. सुशांतचे वडील कृष्ण किशोर सिंह यांनी दिल्‍ली हायकोर्टात याचिका दाखल करून मुलाच्या जीवनावर आधारित बनत असलेल्या चित्रपटात किंवा कोणत्याही दुसऱ्या चित्रपटात त्याच्या नावाच्या किंवा त्याच्याशी मिळतं जुळतं पात्र वापरण्यावर स्थगिती लावण्याची मागणी केली होती. तसंच 'न्याय: द जस्टिस', 'सुसाइड ऑर मर्डर : अ स्टार वॉज लॉस्ट', 'शशांक' आणि आणखी एका चित्रपटाचाही त्यांनी उल्लेख केला होता. हे सर्व चित्रपट सुशांत सिंह राजपूतच्या जीवनावर आधारित आहेत.

(वाचा-Desirable Women होताच रिया चक्रवर्तीचा भाव वधारला? मिळाली थेट द्रौपदीची भूमिका)

सुशांत सिंह राजपूतनं 14 जून, 2020 ला मुंबईच्या वांद्र्यातील फ्लॅटमध्ये फाशी घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर त्याच्या या मृत्यू प्रकरणाचा तपास हत्येच्या दिशेनं सुरू झाला आणि ड्रग्ज कनेक्शनपर्यंत पोहोचला आहे.

सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांना अॅक्ट्रेस रिया चक्रवर्तीच्या विरोधात सुशांतला आत्महत्या करण्यासाठी कारणीभूत ठरल्याचा आरोप करत तक्रार दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल करत रियाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. अनेक दिवस तुरुंगात राहिल्यानंतर तिला जामीन मिळाला होता. सध्या ड्रग्जच्या अँगलनंही या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

First published:
top videos

    Tags: Delhi high court, Suicide, Sushant Singh Rajpoot, Sushant singh rajput case, Upcoming movie