मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सुशांत कधीच कोणत्या ऑडिशनमध्ये झाला नव्हता अपयशी; मुकेश छाबरांचा VIDEO होतोय VIRAL

सुशांत कधीच कोणत्या ऑडिशनमध्ये झाला नव्हता अपयशी; मुकेश छाबरांचा VIDEO होतोय VIRAL

 छोट्या पडद्यावरून करीयरची सुरुवात करणाऱ्या सुशांतने खूप कमी वेळेत प्रचंड लोकप्रियता मिळवली होती.

छोट्या पडद्यावरून करीयरची सुरुवात करणाऱ्या सुशांतने खूप कमी वेळेत प्रचंड लोकप्रियता मिळवली होती.

छोट्या पडद्यावरून करीयरची सुरुवात करणाऱ्या सुशांतने खूप कमी वेळेत प्रचंड लोकप्रियता मिळवली होती.

मुंबई, 10 जून-  बॉलिवूड अभिनेता(Bollywood Actor) सुशांत सिंह राजपूतच्या(Sushant Singh Rajput)  पहिल्या स्मृतिदिनाच्या आधी चाहते आणि त्याचे सहकारी अनेक आठवणी शेयर करत आहेत. गेल्यावर्षी 14 जून यादिवशी सुशांतने गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यामुळे सर्वांनाचं मोठा धक्का बसला होता. छोट्या पडद्यावरून करीयरची सुरुवात करणाऱ्या सुशांतने खूप कमी वेळेत प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. पीके, एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी, छिछोरे, काय पो छे यामधून त्याने आपल्या उत्तम अभिनयाची झलक दाखवली आहे.

View this post on Instagram

A post shared by MCCC (@mukeshchhabracc)

सुशांत सिंह आपल्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वांचाचं लाडका झाला होता. मात्र तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? ती म्हणजे सुशांत कधीच आपल्या कोणत्या ऑडीशनमध्ये अपयशी झाला नव्हता. गेल्यावर्षी सुशांतच्या निधनानंतर कास्टिंग डायरेक्टर असणाऱ्या मुकेश छाबडा यांनी या गोष्टीचा खुलासा केला होता. सुशांतच्या अभिनय प्रवासाचा आढावा घेणारा एक भावुक व्हिडीओ त्यांनी शेयर केला होता. त्या व्हिडीओमध्ये आमिर खान आणि अनुष्का शर्माच्या पीके चित्रपटासाठी सुशांतने दिलेल्या ऑडीशनची क्लिपसुद्धा आहे.

(हे वाचा: कोण आहे यश दासगुप्ता? नुसरत जहाँसोबत जोडलं जातंय नाव )

गेल्यावर्षी जूनमध्ये शेयर केलेल्या या व्हिडीओला कॅप्शन देत त्यांनी लिहिलं होतं, ‘सुशांत सिंह राजपूत एक असा मुलगा आहे, जो कधीचं कोणत्या ऑडीशनमध्ये अपयशी नाही झाला. सुशांतने आपल्या खास प्रभावाने चाहत्यांच्या मनाला भुरळ पाडली होती. सुशांत सिंह राजपूत आणि त्याच्या या प्रवासाला नेहमीच लक्षात ठेवलं जाईल’. अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली होती.

First published:
top videos

    Tags: Sushant sing rajput