Desirable Women होताच रिया चक्रवर्तीचा भाव वधारला? मिळाली थेट द्रौपदीची भूमिका

Desirable Women होताच रिया चक्रवर्तीचा भाव वधारला? मिळाली थेट द्रौपदीची भूमिका

Most Desirable Woman बनताच रिया चक्रवर्तीला मिळू लागल्या चित्रपटांच्या ऑफर्स

  • Share this:

मुंबई 10 जून: गेल्या वर्षभरापासून सतत चर्चेत राहीलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) या ही वर्षी सातत्याने चर्चेत आहे. नुकतीच रियाची सर्वात आकर्षक महिलांमध्ये निवड झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे सगळीकडे रियाची चर्चा आहे.

टाइम्स मोस्ट डिझायरेबल वुमन (Most Desirable Woman) म्हणून रियाचही नाव समोर आलं होतं. ही निवड सुंदरता किंवा लुक्सवर आधारीत नाही तर ती व्यक्तीची किती चर्चेत राहीली व लोकांनी त्या व्यक्तिचा किती विचार केला यावर आधारीत असते. पण त्यानंतर रियाला काही चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्याचं समोर येत आहे.

मिका सिंगने दाखवला दानशुरपणा; 10000 गरजूंना अन्नदान करत केलं B'day Celebration

रियाला महाभारत (Mahabharat) कथेवर आधारीत एका चित्रपटासाठी दौपदीचा रोल ऑफर करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. टाइम्स ऑफ इंडियाने (TOI) दिलेल्या एका वृत्तानुसार, ‘हा महाभारत आणि दौपदीच्या कथेवर आधारीत आगळा वेगळा चित्रपट असणार आहे. तर वेगळ्या आणि आधुनिक जगातील ही कथा असणार आहे. हा असा चित्रपट असणार आहे जो कधीही झाला नाही. तर दौपदीची भूमिका रियाला देण्यासाठी तिच्यासोबत बोलणी सुरू आहे. पण अद्याप चित्रपट हा सुरुवातीच्याच टप्प्यात आहे.’

रिया सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणानंतर विशेष चर्चेत आली. आणि वर्षभर ती निरनिराळ्या परिस्थितीतून गेली आहे. तर आता ती स्वतःला या परिस्थितून सावरून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. व काम मिळवण्याचाही प्रयत्न करत आहे.

याशिवाय आता रियाने सोशल मीडियावरही सक्रिय होण्यास सुरुवात केली आहे. मागील वर्षीच्या सगळ्या प्रकरणानंतर रिया मीडिया तसेच सोशल मीडिया या सगळ्यांपासून फार दूर होती. पण आता तिने सोशल मीडियावर पोस्ट करायलाही सुरूवात केली आहे. तिच्या शेवटच्या पोस्टमध्ये तिने लिहिलं आहे, ‘कशी मोठ्या संकटानंतर मोठी ताकद मिळते’. यानंतर तिच्या फॉलोवर्सने तिला अनेक शुभेच्छाही दिल्या.

Published by: News Digital
First published: June 10, 2021, 10:33 AM IST

ताज्या बातम्या