जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: दीपवीर खूप दिवसांनी एकत्र; हातात हात घालून रणवीर-दिपिकाचा हटके अंदाज

VIDEO: दीपवीर खूप दिवसांनी एकत्र; हातात हात घालून रणवीर-दिपिकाचा हटके अंदाज

रणवीर सिंह, दीपिका पादुकोण

रणवीर सिंह, दीपिका पादुकोण

दीपिका रणवीर बऱ्याच काळापासून एकत्र दिसत नसल्यामुळे दोघेही विभक्त होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अनेक महिन्यांनंतर दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह अखेर गुरुवारी एका अवॉर्ड नाईटमध्ये एकत्र आले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 नोव्हेंबर : बॉलिवूडचे पॉवर कपल म्हणून  अभिनेत्री दीपिका पादुकोण  आणि  अभिनेता रणवीर सिंह  ओळखले जातात. दोघेही कायमच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. खूप काळांनंतर हे कपल एकत्र स्पॉट झालं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर रणवीर-दीपिकाची चांगलीच चर्चा रंगलेली दिसतेय. नुकतंच रणवीर आणि दीपिकाने GQ पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली. यावेळीचे त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दीपिका रणवीर बऱ्याच काळापासून एकत्र दिसत नसल्यामुळे दोघेही विभक्त होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अनेक महिन्यांनंतर दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह अखेर गुरुवारी एका अवॉर्ड नाईटमध्ये एकत्र आले. GQ मेन ऑफ द इयर अवॉर्ड्समध्ये एकत्र हजेरी लावल्यानंतर त्यांचे चाहते त्यांना एकत्र पाहून खूप आनंदी आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त करत आहेत. हेही वाचा -  एकेकाळी राखी बांधणारी श्रीदेवी कशी झाली Boney Kapoor ची पत्नी, फिल्मपेक्षा भारी लव्हस्टोरी समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की, दीपिका रणवीरने एकमेकांच्या हातात हात घालून अवॉर्ड नाईटमध्ये हजेरी लावली. यावेळी दोघांचा नेहमीप्रमाणे हटके अंदाज पहायला मिळाला. त्यांचा हा व्हिजीओ विरल बयानीने त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

जाहिरात

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी 2018 मध्ये लग्न केले होते. दोघांचं लग्न बी-टाऊनमध्ये चांगलाच चर्चेचा विषय ठरला. मात्र गेल्या काही काळात त्यांच्यामध्ये काही अलबेल नसल्याच्या चर्चा होत्या. दोघांनीही एकमेकांविषयी पोस्ट टाकत आणि मुलाखतीत बोलत या अफवा फेटाळल्या होत्या.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रणवीर सिंह ‘सर्कस’ या चित्रपटात पूजा हेगडे आणि जॅकलिन फर्नांडिससोबत दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी डिसेंबरमध्ये थिएटरमध्ये दाखल होणार आहे. ‘सर्कस’ व्यतिरिक्त तो करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये आलिया भट्टसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. दुसरीकडे, दीपिका पादुकोणचे अनेक मोठे चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. ती शाहरुख खानसोबत ‘पठाण’मध्ये स्क्रीन शेअर करत आहे. याशिवाय ती तिच्या पुढच्या प्रोजेक्टची शूटिंग करत आहे ज्यात प्रभास आणि अमिताभ बच्चन देखील आहेत. ‘द इंटर्न’च्या हिंदी रिमेकमध्येही दीपिका दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात