रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणचा बहुप्रतिक्षित चित्रपट '83' ख्रिसमसच्या एक दिवस आधी रिलीज होणार आहे. याआधी निर्मात्यांनी मुंबईत चित्रपटाचा प्रीमियर केला होता. या कार्यक्रमात चित्रपटातील कलाकारांसह सर्व बॉलिवूड सेलिब्रिटींनीहीउपस्थिती लावली होती. दीपिका पदुकोणने चित्रपटाच्या प्रीमियरसाठी सुंदर काळा गाऊन परिधान केला होता. तर रणवीर सिंहने रेड कार्पेट इव्हेंटसाठी कॅज्युअल पांढरा सूट निवडला होता. मात्र प्रीमियरनंतर लगेचच, दीपिका पदुकोण एका कॅज्युअल ड्रेसमध्ये दिसून आली.