नेटकऱ्यांनी दीपिकाच्या केसांच्या उडवली खिल्ली दीपिकाचा फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला सल्ले देण्यास सुरूवात केली आहे. काहीजण तिला चांगला हेअर कट करण्याचा सल्ला देत आहे तर कोण म्हणत आहे, आंघोळ कर आता एवढी पण थंडी नाही. तर एकाने म्हटले आहे की, एवढे पैसे काय करणार. तेल आणि शॉम्पू घे. तर एकाने म्हटले आहे की, हिनं चांगला हेअर कट करणे गरजेचे आहे. तर एकाने असच गंमतीने म्हटले आहे की, बहुतेक हिला कोम सापडला नाही....अशा अनेक भन्नाट कमेंट दीपिकाच्या या फोटोवर येत आहे. वाचा-'मैत्रिणींनी चेष्टा केली पण आज..' नथीला पत्नीचं नाव मिळाल्याने प्रसाद भावुक दीपिका नुकतीच पती रणवीर सिंहसोबत 83 सिनेमात दिसली होती. या सिनेमात दीपिकाने क्रिकेटर कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. दीपिका आणि रणवीरच्या अभिनयाचे कौतुक झाले. सेलेब्स नवीन लुक नेहमी ट्राय करत असतात. चाहते देखील त्यांना नवीन लुकमध्ये पाहण्यासाठी उत्सुक असतात. मात्र प्रत्येक लुक चाहत्यांना आवडेल असं नाही. अनेकवेळा लुकमुळे मोठमोठे सेलेब्स सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसतात. दीपिकाचा नवरा रणवीर सिंह त्याच्या अतरंगी स्टाईलसाठी ओळखला जातो. अनेकदा तो या अतरंगी स्टाईलमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.