Home /News /entertainment /

'मित्र मैत्रिणींनी तुझी चेष्टा केली.; पण आज...' नथीच्या ब्रँडला बायकोचं नाव मिळाल्यावर प्रसाद ओक झाला भावुक

'मित्र मैत्रिणींनी तुझी चेष्टा केली.; पण आज...' नथीच्या ब्रँडला बायकोचं नाव मिळाल्यावर प्रसाद ओक झाला भावुक

अभिनेता प्रसाद ओक नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांची संपर्कात असतो. आता प्रसाद ओकने त्याची पत्नी मंजिरी ओक हिच्यासाठी एक पोस्ट लिहिली आहे. त्याच्या या पोस्टनंतर मंजिरीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

  मुंबई, 12 जानेवारी- दिग्दर्शन, अभिनेता, गायक, सुत्रसंचालक अशा वेगवेगळया व्यक्तिरेखांमधून प्रसाद ओकने (prasad oak) आपली छाप सोडली आहे. अभिनेता प्रसाद ओक नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांची संपर्कात असतो. आता प्रसाद ओकने त्याची पत्नी मंजिरी ओक हिच्यासाठी एक पोस्ट लिहिली आहे. त्याच्या या पोस्टनंतर मंजिरीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिवाय तिचं कौतुक देखील होत आहे. अभिनेते प्रसाद ओकची बायको मंजिरी ओक ही एक व्यावसायिक आहेत. सोशल मिडीयावर विविध ब्रँडसोबत कोलॅबोरेशन करून मंजिरी छोट्या उद्योजकांना मदत करताना दिसते. तिच्या याच कामामुळे तिला एक मोठा गौरव प्राप्त झाला आहे. कारण एका नथीला मंजिरी ओकचे नाव मिळाले आहे. ही नथ आता 'मंजिरी नथ' म्हणून ओळखली जाणार आहे. प्रसाद ओकने याची माहिती सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. प्रसाद ओकने म्हटले आहे की, प्रिय मंजू.. आज प्रचंड अभिमान वाटतोय तुझा. छोट्या छोट्या उद्योजकांना छोटीशी मदत व्हावी या निर्मळ उद्देशानी तू हे कोलॅबोरेशन वगैरे सुरु केलंस. या निरपेक्ष हेतूंचं फळ म्हणूनच कि काय...आज एका "नथी" ला तुझं नाव लागलंय. "मंजिरीनथ" वाचा-'आई कुठे काय करते' फेम अरुंधतीच्या रिअल लाईफ लेकीला पाहिलंत का? आहे फारच क्युट आपल्या अनेक मित्र मैत्रिणींनी आपल्या पाठीमागे तुझी चेष्टा केली... तुझ्या so called जवळच्या मैत्रिणींपैकी एकीनेही तुझं कधीही कौतुक केलं नाही. पण या सगळ्या गोष्टींना मागे टाकत...या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून तू आज स्वतःची वेगळी ओळख निर्माण करते आहेस याचा खूप अभिमान वाटतोय. खूप खूप खूप प्रेम ❤️❤️❤️❤️❤️ ..!!#love #proud #proudhusband#keepitup #फालतूलोकांकडेदुर्लक्षचकर #godblessyou...अशी काहीशी त्याने पोस्ट लिहिली आहे. यावर अनेक चाहत्यांसह सेलेब्सने कमेंट करत या निरपेक्ष हेतूंचं फळ मिळाल्याबद्दल मंजिरीचे कौतुक केले आहे.
  मंजिरीने देखील पोस्ट लिहित सर्वांचे आभार मानले आहेत. तिनं म्हटलं आहे की, छोट्या छोट्या उद्योजकांना माझ्याकडून छोटीशी मदत व्हावी या उद्देशानी मी "कोलॅबोरेशन" सुरु केलं. या निरपेक्ष हेतूंचं फळ म्हणूनच कि काय...आज एका "नथी" ला माझं नाव दिलं गेलंय "मंजिरी नथ".लोकांच्या चेहऱ्यावर आनंद यावा म्हणून मी प्रयत्न केले...करत राहीनच... पण आज माझ्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान सुद्धा आहे... आणि तो तंतु यांच्यामुळे आलाय. तेव्हा स्वाती घोडके यांचे मनःपूर्वक आभार.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या