VIDEO : पाकिस्तानी अभिनेत्यासाठी गुडघ्यावर बसली दीपिका, रणवीरनं दिली अशी रिअ‍ॅक्शन

VIDEO : पाकिस्तानी अभिनेत्यासाठी गुडघ्यावर बसली दीपिका, रणवीरनं दिली अशी रिअ‍ॅक्शन

हा व्हिडीओ त्यावेळचा आहे जेव्हा दीपिका आणि रणवीरचं लग्न झालं नव्हतं.

  • Share this:

मुंबई, 5 जून : बॉलिवूडचं हॉट कपल रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असतात. सध्या हे दोघंही त्यांच्या मुंबईच्या घरी लॉकडाऊन आहेत. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघंही चाहत्यांशी संवाद साधताना दिसतात. पण सध्या एका थ्रोबॅक व्हिडीओमुळे हे दोघंही चर्चेत आले आहेत. हा व्हिडीओ कोणत्यातरी अवॉर्ड शोमधील आहे. ज्यात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान दीपिकाला इंप्रेस करताना दिसत आहे. फवादला असं करताना पाहून रणवीरनं दिलेली रिअ‍ॅक्शन पाहण्यासारखी आहे. हा व्हिडीओ त्यावेळचा आहे जेव्हा दीपिका आणि रणवीरचं लग्न झालं नव्हतं.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये पाहता येईल की, दीपिका पदुकोण करण जोहर आणि फवाद खान यांच्यासोबत स्टेजवर उभी आहे. यावेळी फवाद दीपिकाला इंप्रेस करण्यासाठी 'रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना' हे गाणं गायला सुरुवात करतो. ज्यावर दीपिका फवादला मिठी मारते आणि दुसऱ्याच क्षणाला ती फवाद समोर गुडघ्यावर बसते. ज्यावर फवाद लाजतो आणि तिच्या समोर खाली बसतो. यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या रणवीरच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र लगेच बदलतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

'हनीमूनच्या रात्रीच त्यानं माझा सौदा केला होता' करिश्मा कपूरचा धक्कादायक खुलासा

दीपिकाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर जानेवारीमध्ये तिचा छपाक हा सिनेमा रिलीज झाला होता. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा फारसा चालला नसला तरीही समीक्षकांनी या सिनेमावर चांगल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या आणि दीपिकाच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं. लवकरच दीपिका रणवीरसोबत '83' सिनेमात दिसणार आहे. लग्नानंतर या दोघांचा एकत्र हा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमात रणवीर कपिल देव यांची तर दीपिका त्यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारत आहे. याशिवाय तिच्याकडे स्वतःची निर्मिती असलेला 'द : इंटर्न' हा हॉलिवूड सिनेमाचा रिमेक आणि शगुन बात्राचा अनटायटल्ड सिनेमा सुद्धा आहे.

अक्षय ठरला फोर्ब्सच्या यादीत एकमेव भारतीय सेलिब्रेटी, एवढी आहे वर्षभरातली कमाई

सोनू सूदच्या नावावर सुरू आहे फसवणूक, अभिनेत्यानं असं केलं सावध

First published: June 5, 2020, 3:04 PM IST

ताज्या बातम्या