'दीपिकानं मला घरातून बाहेर काढण्याचा प्लान केला होता', आईचा धक्कादायक खुलासा!

'दीपिकानं मला घरातून बाहेर काढण्याचा प्लान केला होता', आईचा धक्कादायक खुलासा!

असं काय कारण होतं की ज्यामुळे दीपिकानं तिची बहीण आणि वडीलांसोबत मिळून आईला घरातून बाहेर काढण्याचा प्लान केला होता.

  • Share this:

मुंबई, 30 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिचा आगामी सिनेमा 'छपाक'मुळे सगळीकडे चर्चेत आहे. या सिनेमातील दीपिकाच्या लूकवर चाहत्यांपासून ते बॉलिवूडच्या कलाकारांपर्यंत सर्वांच्याच प्रतिक्रिया येत असून सर्वत्र दीपिकाचं कौतुक होत आहे. अशातच दीपिकाच्या आईची एक मुलाखतही चर्चेचा विषय बनली आहे. दीपिकाची आई उज्जला पदुकोण यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या दोन्ही मुली आणि पतीबाबत एक धक्कादायक खुलासा केला. यावेळी उज्जला म्हणाल्या, 'माझ्यावर अशी वेळ आली होती की, माझ्या दोन्ही मुली आणि पती मला घरातून बाहेर काढण्याच्या विचार होते.'

उज्जला पदुकोण सांगतात, माझे वडील एका ब्रिटिश बोर्डिंग स्कूलमध्ये शिकलेले आहेत. त्यामुळे ते शिस्तप्रिय आहेत. माझ्या घरी मी शिस्तप्रिय वातावरणात वाढले. माझ्या घरी सर्व नियम खूप कडक होते. त्यामुळे मला अशा वातावरणाची सवय लागून राहीली होती. मात्र यामुळे माझ्या दोन्ही मुली दीपिका आनीशा आणि माझे पतीही त्रासले होते.

बॉलिवूडच्या मस्तानीनं नाकारलेले सलमानचे हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर ठरले सुपरहिट

दीपिकाच्या आईनं पुढे म्हणाल्या, मला माझ्या घरी शिस्तप्रिय वातावरणाची सवय लागल्यानं माझ्या कुटूंबियांसोबतही मी तशीच वागत होते. पण यामुळे घरातील सर्वजण एवढे त्रासले होते की माझ्या दोन्ही मुली आणि पती मिळून मला घरातून बोहेर काढायच्या विचारात होते.

इतरांप्रमाणेच दीपिका आणि तिची लहान बहीण अनीशाचा त्यांच्या आईशी खूप जवळचं नात आहे. दीपिका अनेकदा आपल्या आईसोबतचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करताना दिसते. ज्यात त्यांच्या नात्यातील गोडवा लक्षात येतो. दीपिका नेहमीच तिच्या बीझी शेड्युल्डमधून वेळ काढून कुटूंबासाठी वेळ देत असते. इतरांप्रमाणेच दीपिका आणि तिची लहान बहीण अनीशाचा त्यांच्या आईशी खूप जवळचं नात आहे. दीपिका अनेकदा आपल्या आईसोबतचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करताना दिसते. ज्यात त्यांच्या नात्यातील गोडवा लक्षात येतो. दीपिका नेहमीच तिच्या बीझी शेड्युल्डमधून वेळ काढून कुटूंबासाठी वेळ देत असते.

अर्जुन कपूरआधी बॉलिवूडच्या या खानाशी जोडलं गेलं होतं मलायकाचं नाव

दीपिकाचा ‘छपाक’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मेघना गुलजार यांचा 'छपाक' हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधरित आहे. 22 एप्रिल 2005मध्ये लक्ष्मीवर अ‍ॅसिड हल्ला झाला होता. दीपिकानं 'छपाक'साठी खूप मेहनत घेतली आहे. सिनेमाच्या शूटिंग दरम्यान ती अनेकदा दिल्लीच्या रस्त्यांवर स्पॉट झाली. सुरुवातीला तर सिनेमातील तिच्या बदललेल्या लुकमुळे तिला ओळखणंही सर्वांना कठीण झालं होतं. या सिनेमात दीपिकासोबत अभिनेता विक्रांत मेस्सीसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा 10 जानेवारी 2020ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

याशिवाय कबीर खानच्या ‘83’ मध्ये दीपिका पती रणवीर सिंह सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या सिनेमात ती क्रिकेटर कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. रणवीर सिंह या सिनेमात क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारत आहे.

दिवाळी साजरी करण्यापासून रोखलं, अभिनेत्यानं ट्विटरवरुन पीएम मोदींकडे मागितली मदत

=======================================================================

SPECIAL REPORT : एक भाऊबीज अशीही...शहीदांच्या पत्नीसोबत साजरी केली दिवाळी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2019 04:03 PM IST

ताज्या बातम्या