मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /फॅन्सनी गुपचूप दुबईत बनवलेला दीपिका पादुकोणचा 'तो' VIDEO व्हायरल

फॅन्सनी गुपचूप दुबईत बनवलेला दीपिका पादुकोणचा 'तो' VIDEO व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (deepika padukone) तिच्या कामातून वेळ काढून दुबईला गेली आहे. दीपिकाच्या या दुबई ट्रीपचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (deepika padukone) तिच्या कामातून वेळ काढून दुबईला गेली आहे. दीपिकाच्या या दुबई ट्रीपचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (deepika padukone) तिच्या कामातून वेळ काढून दुबईला गेली आहे. दीपिकाच्या या दुबई ट्रीपचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत.

0मुंबई, 1 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (deepika padukone) तिच्या कामातून वेळ काढून दुबईला गेली आहे. दीपिकाला आई उजाला यांच्यासोबत दुबईतील एका मॉलमध्ये स्पॉट करण्यात आलं आहे. दीपिकाच्या या दुबई ट्रीपचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. दीपिकाच्या फॅन्सनीं देखील सोशल मीडियावर याचे काही फोटो व व्हिडिओ शेअर केले आहेत.

दीपिका या फोटोंमध्ये आईसोबत शॉपींग करताना दिसत आहे. दीपिका फुल ब्लॅक आउटफिटमध्ये होती. शॉपिंगच्या वेळीही दीपिका या कॅज्युअल लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. यादरम्यान दीपिका चाहत्यांसोबत सेल्फी काढतानाही दिसली.

आपल्या आईसोबत डिनर डेटवर पोहोचलेली दीपिका चाहत्यांच्या कॅमेऱ्यापासून वाचू शकली नाही आणि तिचे फोटो अनेक फॅन पेजवर व्हायरल झाले. दीपिका पादुकोण फॅन्सच्या इन्स्टा पेजवर दीपिकाच्या दुबई ट्रिपचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तुम्हाला पाहायला मिळतील.

वाचा : दिव्या भारतीच्या वडिलांचं निधन; साजिद नाडियाडवाला शेवटपर्यंत होता सोबत

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर दीपिकाचे येणारे वर्ष खूप व्यस्त असणार आहे. दीपिका अनेक मोठ्या प्रोजेक्ट्स एक भाग आहे. शकुन बत्रा दिग्दर्शित एका चित्रपटात दीपिका अभिनेत्री अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत लव्ह ट्रँगलमध्ये दिसणार आहे. दुसरीकडे, रणवीर सिंहसोबत ती 83 मध्ये पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. दीपिकाने या चित्रपटाची सहनिर्मितीही केली आहे.

वाचा : Zee Marathi Award वर नेटकरी नाराज; 'पसंती एकास पुरस्कार दुसऱ्यास'

यासोबतच दीपिका सिद्धार्थ आनंदच्या पठाण या चित्रपटाचाही एक भाग आहे. या चित्रपटात ती शाहरुख आणि जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. दीपिका एका अॅक्शन ड्रामा चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटासाठी तिने विशेष अॅक्शन प्रशिक्षणही सुरू केले आहे.

या चित्रपटात दीपिका पहिल्यांदाच हृतिक रोशनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या फ्रेश कपलला पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

First published:

Tags: Bollywood, Bollywood News, Deepika padukone, Entertainment