मुंबई, 03 मार्च: यंदाच्या ऑस्कर सोहळ्याकडे कडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. यंदाचा सोहळा भारतासाठी खूपच खास ठरणार आहे. भारतातील ‘चेल्लो शो’ आणि ‘आरआरआर’चे ‘नातू नातू’ हे गाणे ऑस्करसाठी नामांकन झाले आहे. त्यामुळे यंदा आपण ऑस्कर पटकावणार कि नाही हे पाहण्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. तसेच ऑस्करच्या या दिमाखदार सोहळ्यात ‘नातू नातू’ या गाण्यावर खास परफॉर्मन्स सादर होणार आहे. ही भारतासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. त्यासोबत आता दुसरीकडे अभिनेत्री दीपिका पदुकोणला ऑस्कर सोहळ्यात सहभागी होणार असून तिच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे अशी माहिती समोर आली आहे. कान्स सारख्या जागतिक पुरस्कारांमध्ये सहभागी झाल्यानंतर आता दीपिका पदुकोण ऑस्करमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. एवढंच नाही तर तिच्यावर एक मोठी जबाबदारी असणार आहे. येत्या 13 मार्च रोजी होणाऱ्या ऑस्कर सोहळ्यात पुरस्काराची प्रस्तुतकर्ता म्हणून दीपिकाची निवड झाली आहे. खुद्द दीपिका पदुकोणनेच चाहत्यांना ही माहिती दिली आहे. Isha Keskar: ‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात आहे ईशा केसकर; वाढदिवशी रोमँटिक पोस्ट करत म्हणाली…. दीपिका पदुकोणने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर याची माहिती देताच चाहत्यांनी मध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. ‘पठाण’ चित्रपटातील अभिनेत्रीच्या बिकिनीवरून गोंधळ निर्माण करणाऱ्या आणि चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी करणाऱ्यांना शांत करण्यासाठी ही बातमी पुरेशी आहे असं म्हटलं जात आहे. दीपिका पदुकोण ऑस्करची प्रेझेंटर बनल्याच्या बातमीनेसगळ्यांनाच आनंद झाला आहे. नेहा धुपियापासून पती रणवीर सिंगपर्यंत तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
दीपिकाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिच्याशिवाय इतर कोणते सेलिब्रिटी यावेळी ऑस्कर 2023 मध्ये सादर करणार आहेत हेही सांगितलं आहे. दीपिकाने पोस्टमध्ये, यंदाच्या ऑस्करमध्ये ड्वेन जॉन्सन, मायकेल बी. जॉर्डन, जेनिफर कोनेली, सॅम्युअल एल. जॅक्सन, मेलिसा मॅककार्थी, झो सालडाना, जोनाथन मेजर्स, क्वेस्टलव्ह आणि डॉनी येन हे प्रेझेंटर असतील हे सांगितलं आहे.
आता दीपिका पदुकोण केवळ भारतातच नाही तर जगात लोकप्रिय स्टार आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. तिचे आकर्षण परदेशातही पाहायला मिळत आहे. कान्स आणि इतर फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागानंतर आता दीपिका पदुकोण ऑस्करवरमध्ये दिसण्यासाठी सज्ज झाली आहे. दीपिका पदुकोण ऑस्कर प्रस्तुतकर्ता आहे, तर ‘नातू नातू’ गायक राहुल सिपलीगुंज आणि काल भैरव ऑस्करच्या रात्री लाइव्ह परफॉर्म करतील. ‘नातू नातू’ला ऑस्करच्या ‘बेस्ट ओरिजिनल सॉन्ग’ श्रेणीत नामांकन मिळाले आहे. याशिवाय आणि ‘चेलो शो’ या भारतातील दोन माहितीपट - ऑल दॅट ब्रेथ्स आणि द एलिफंट व्हिस्परर्स यांनाही नामांकन मिळाले आहे.