जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / करण जोहर यांच्या घरातही कोरोनाने केला प्रवेश, दोन कर्मचारी पॉझिटिव्ह

करण जोहर यांच्या घरातही कोरोनाने केला प्रवेश, दोन कर्मचारी पॉझिटिव्ह

करण जोहर यांच्या घरातही कोरोनाने केला प्रवेश, दोन कर्मचारी पॉझिटिव्ह

हा अतिशय कठिण काळ असून आपल्या कर्मचाऱ्यांना चांगल्यात चांगले उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 25 मे :  बॉलिवूडचे निर्माता- दिग्दर्शक करण जोहर यांच्या घरातही कोरोनाने प्रवेश केला आहे. त्यांच्या घरातल्या दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे करण जोहर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी स्वत:ला क्वारंटाइन केलं आहे. करण जोहर यांच्या वतीने एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. आपण आणि कुटुंबीय सुरक्षित आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे. करण जोहर यांच्या घरात आणि ऑफिसमध्ये काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसत होती. त्यानंतर त्यांना आयसोलेट करण्यात आलं होतं. त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आता त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. ही सगळी माहिती प्रशासन आणि बीएमसीला कळविण्यात आल्याचं करण जोहर यांनी म्हटलं आहे. हा अतिशय कठिण काळ असून आपल्या कर्मचाऱ्यांना चांगल्यात चांगले उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. आम्ही सगळ्यांनी चाचणी करून घेतली आणि ती निगेटिव्ह आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या आधीही बोनी कपूर यांच्या घरी काम करणाऱ्या एकाला कोरोना झाल्याचं आढळलं  होतं.

मुंबई आणि राज्यात कोरोना रुग्णांचा होणारा गुणाकार आजही कायम राहिला आहे. राज्यात आजही उच्चांकी २४२६ नवे रुग्ण सापडले. तर ६० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ५२६६७ एवढी झाली आहे. त्यात ॲक्टिव्ह केसेस ३५१७८ एवढ्या आहेत. तर आज ११८६ जणांचा डिस्चार्ज मिळाला. मुंबईत २४ तासांमध्ये १४३० रुग्ण वाढले आहेत. दरम्यान रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सरकारने सुविधांची मोठ्या संख्येने निर्मिती सुरू केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात