जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ...म्हणून 'छपाक'च्या सेटवर पहिल्याच दिवशी दीपिकाला कोसळलं होतं रडू

...म्हणून 'छपाक'च्या सेटवर पहिल्याच दिवशी दीपिकाला कोसळलं होतं रडू

...म्हणून 'छपाक'च्या सेटवर पहिल्याच दिवशी दीपिकाला कोसळलं होतं रडू

‘छपाक’ दीपिकाच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा सिनेमा आहे. मात्र या सिनेमाचं शूट तिच्यासाठी अजिबात सोपं नव्हतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 डिसेंबर : अभिनेत्री दीपिका पदुकोणनं मागच्या 12 वर्षात बॉलिवूडमध्ये स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ज्यामुळे प्रत्येक दिग्दर्शक तिला आपल्या सिनेमात घेण्यासाठी उत्सुक आहे. ‘ओम शांति ओम’ मधील शांतिप्रिया असो की मग ‘पद्मावत’मधील पद्मावती. दीपिकानं प्रत्येक भूमिका तेवढ्याच ताकदीनं साकारली आणि प्रेक्षकांवर आपला वेगळा ठसा उमटवला. यानंतर आता ती लवकरच मेघना गुलजारच्या ‘छपाक’ या सिनेमात दिसणार आहे.काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. त्यानंतर या सिनेमातील कामाबद्दल दीपिकाचं खूप कौतुकही झालं. ट्रेलर लॉन्चच्या दिवशी दीपिकाला अश्रू अनावर झालेले सर्वांनी पाहिले पण या आधीही दीपिकासोबत असंच काहीसं घडलं होतं. सिनेमाच्या शूटिंगच्या पहिल्याच दिवशी दीपिका ढसाढसा रडल्याची माहिती आता समोर आली आहे.

जाहिरात

‘छपाक’ हा सिनेमा दिल्लीची अ‍ॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवाल हिच्यावर आधारित आहे. यामध्ये दीपिका लक्ष्मीची भूमिका साकारत आहे. काही महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकानं ही भूमिका माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे असं सांगितलं होतं. या भूमिकेबाबत दीपिका खूप भावूक आहे आणि त्यामुळेच शूटिंगच्या पहिल्याच दिवशी तिला रडू आलं. पहिल्या सीनच्या अगोदर दिग्दर्शक मेघना गुलजार यांच्याशी चर्चा करताना दीपिका अचानक रडू लागली पण नंतर तिनं स्वतःला सावरलं आणि शूटिंगला सुरुवात केली. ‘छपाक’ ट्रेलर रिलीजनंतर नाराज आहे लक्ष्मी अग्रवाल? मेघना गुलजार दिग्दर्शित ‘छपाक’मध्ये मालती नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चमध्ये दीपिका खूपच भावूक झाली होती या कार्यक्रमात ती रडतानाही दिसली होती. या कार्यक्रमात बोलताना दीपिका म्हणाली, ‘असं फार कमी वेळी घडतं की तुम्हाला एक कथा मिळते आणि त्यातील व्यक्तिरेखा तुम्हाला बऱ्याच काळासाठी प्रभावित करते. हा सिनेमा कोणत्या घटनेबद्दल नाही तर त्या घटनेनंतर त्यातून बाहेर पडून पुन्हा उभं राहण्याचा आणि लढाई जिंकण्यावर आधारित असलेली ही कथा आहे.’

दीपिका पुढे म्हणाली, माझ्यासाठी सौभाग्यपूर्ण गोष्ट होती की मला लक्ष्मीला भेटण्याची संधी मिळाली. आम्ही प्रमाणिकपणे तिच्या संघर्षाची ही कथा मोठ्या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. लक्ष्मीनं जेव्हा मला मालतीच्या वेशात पाहिलं त्यावेळी तिला वाटलं की ती स्वतःला आरशात पाहत आहे. त्यादिवशी मी खूप नर्व्हस होते. Bigg Boss 13 : माहिराच्या मनाविरुद्ध पारसनं 3 वेळा केलं KISS, VIDEO VIRAL मेघना गुलजार यांचा ‘छपाक’ हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधरित आहे. 22 एप्रिल 2005मध्ये लक्ष्मीवर अ‍ॅसिड हल्ला झाला होता. दीपिकानं ‘छपाक’साठी खूप मेहनत घेतली आहे. सिनेमाच्या शूटिंग दरम्यान ती अनेकदा दिल्लीच्या रस्त्यांवर स्पॉट झाली. सुरुवातीला तर सिनेमातील तिच्या बदललेल्या लुकमुळे तिला ओळखणंही सर्वांना कठीण झालं होतं. या सिनेमात दीपिकासोबत अभिनेता विक्रांत मेस्सीसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा 10 जानेवारी 2020ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरनं केलं STRAPLESS फोटोशूट, पाहा तिचे BOLD PHOTOS

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात