Bigg Boss 13 : माहिराच्या मनाविरुद्ध पारसनं 3 वेळा केलं KISS, VIDEO VIRAL

Bigg Boss 13 : माहिराच्या मनाविरुद्ध पारसनं 3 वेळा केलं KISS, VIDEO VIRAL

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 19 डिसेंबर : बिग बॉसच्या 13 व्या सीझनमध्ये घरात भांडण आणि वादविवाद या सोबत प्रेमाचा काळ सुद्धा सुरू आहे. हिमांशी-असिमनंतर आता माहिरा शर्मा आणि पारस छाब्रा यांच्यात प्रेमाचा बहर यायला सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या ऑफिशिअल सोशल मीडिया पेजवर बुधवारी पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये माहिरा नको म्हणत असतानाही पारस छाब्रा तिला किस करताना दिसत असून. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

बिग बॉसच्या ऑफिशिअल फेसबुक पेजवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये पारस छाब्रा आणि माहिरा शर्मा गप्पा मारताना दिसत आहेत. थोडावेळ गप्पा मारल्यानंतर पारस तिला गालावर किस करतो. माहिरा पारसला विरोध करते, पण पारस पुन्हा तिला किस करतो. त्यानंतर माहिरा त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते मात्र पारस तिला जवळ ओढतो आणि तिसऱ्यांदा किस करतो. या व्हिडीओमुळे माहिरा-पारसची पोलखोल झाली आहे.

सैफ अली खानचा मुलगा पतौडींचा 'वारस', VIDEO VIRAL

हा व्हिडीओ शेअर करताना ‘पारस- माहिरा एकमेकांच्या प्रेमात?’ असं कॅप्शन त्याला देण्यात आलं आहे. मात्र हा व्हिडीओ पाहिल्यावर बिग बॉसचे चाहते मात्र भडकलेले दिसत आहे. एका चाहत्यानं लिहिलं, माहिराला आता तिच्या आईची भीती वाटत नाही का? हे सर्व नाटक आहे. तर काहींना आसिम आणि हिमांशी यांना या दोघांपेक्षा क्यूट म्हटलं आहे.

एका मुलीची आई असलेली ऐश्वर्या राय स्वतःला अशी ठेवते फिट!

काही चाहत्यांनी, शोमध्ये राहण्यासाठी यांना काहीतरी हवं आहे त्यासाठीच हे या सर्व गोष्टींची मदत घेत आहेत असं लिहिलं आहे. काहींनी तर सरळ सरळ बिग बॉसवरच टीका केली आहे. आता काय आम्ही यांचा रोमान्स पाहावा लागणार का असा प्रश्न सोशल मीडियावरुन केला जात आहे. बिग बॉसकडे आता काहीच उरलेलं नाही असंही म्हटलं जात आहे.

विशेष म्हणजे बिग बॉस 13 मध्ये माहिरा शर्मा पहिल्या दिवसांपासून बिग बॉस घरात चर्चेत आहे. तर दुसरीकडे बोटाला झालेल्या सर्जरीमुळे पारसला काही दिवस सिक्रेट रुमध्ये राहावं लागलं होतं. त्यानंतर तो काही दिवसांपूर्वीच बिग बॉसच्या घरात परतला आहे. त्यानंतर माहिरा आण पारस एकमेकांसोबत एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत.

कशी गेली जेलमधील पहिली रात्र, पायल रोहितगीनं शेअर केला अनुभव

Published by: Megha Jethe
First published: December 19, 2019, 9:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading