मुंबई, 19 डिसेंबर : अभिनेत्री दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असलेला छपाक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. ज्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून दीपिकाचं खूप कौतुक केलं जात आहे. पण अशातच हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर या सिनेमाची खरी ‘हिरो’ लक्ष्मी अग्रवाल मात्र नाराज असल्याचं बोललं जात आहे. तसेच लक्ष्मी आणि सिनेमाच्या मेकर्समध्ये वाद झाल्याचंही बोललं जात आहे.
बॉलिवूड हंगामा या वेबसाइटनं दिलेल्या वृत्तानुसार लक्ष्मी अग्रवाल आणि सिनेमाच्या मेकर्समध्ये मानधनाच्या मुद्द्यावरून वाद झाले आहेत. या सिनेमाच्या कॉपीराइटसाठी 13 लाख रुपये देण्यात आले होते. ज्यावेळी तिला ही रक्कम देण्यात आली त्यावेळी लक्ष्मीला यावर कोणताही आक्षेप नव्हता मात्र आता ती आणखी पैशांची मागणी करत आहे. ज्यामुळे सिनेमाचे मेकर्स आणि लक्ष्मी यांच्यात खटके उडत आहेत. तिला मिळालेल्या या मानधनावर लक्ष्मी खूश नसल्याचं बोललं जात आहे. मात्र यावर लक्ष्मी अग्रवालनं यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
Bigg Boss 13 : माहिराच्या मनाविरुद्ध पारसनं 3 वेळा केलं KISS, VIDEO VIRAL
मेघना गुलजार दिग्दर्शित ‘छपाक’मध्ये मालती नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चमध्ये दीपिका खूपच भावूक झाली होती या कार्यक्रमात ती रडतानाही दिसली होती. या कार्यक्रमात बोलताना दीपिका म्हणाली, असं फार कमी वेळी घडतं की तुम्हाला एक कथा मिळते आणि त्यातील व्यक्तिरेखा तुम्हाला बऱ्याच काळासाठी प्रभावित करते. हा सिनेमा कोणत्या घटनेबद्दल नाही तर त्या घटनेनंतर त्यातून बाहेर पडून पुन्हा उभं राहण्याचा आणि लढाई जिंकण्यावर आधारित असलेली ही कथा आहे.
अभिनेत्री श्रद्धा कपूरनं केलं STAPLESS फोटोशूट, पाहा तिचे BOLD PHOTOS
दीपिका पुढे म्हणाली, माझ्यासाठी सौभाग्यपूर्ण गोष्ट होती की मला लक्ष्मीला भेटण्याची संधी मिळाली. आम्ही प्रमाणिकपणे तिच्या संघर्षाची ही कथा मोठ्या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. लक्ष्मीनं जेव्हा मला मालतीच्या वेशात पाहिलं त्यावेळी तिला वाटलं की ती स्वतःला आरशात पाहत आहे. त्यादिवशी मी खूप नर्व्हस होते.
छपाक सिनेमा त्याच्या प्रदर्शनाच्या दिवसापासूनच चर्चेत आहे. शूटिंग दरम्यान या सिनेमाच्या सेटवरील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते तसेच दीपिका सुद्धा अनेकदा दिल्लीमध्ये सार्वजनिक ठिकाणी स्पॉट झाली होती. या सिनेमाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं असून हा सिनेमा 10 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच दिवशी अजय देवगणचा ‘तानाजी’ सिनेमा सुद्धा रिलीज होत आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर दोन्ही सिनेमांमध्ये तगडी टक्कर पाहायला मिळणार आहे.
सैफ अली खानचा मुलगा पतौडींचा 'वारस', VIDEO VIRAL