अभिनेत्री मृणाल ठाकूरने आपल्या अभिनयाने आजपर्यंत मोठी ओळख निर्माण केली आहे. टेलिव्हीझन ते बॉलिवूड असा प्रवास तिने केला आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या खास गोष्टी.
मृणालचा जन्म 1 ऑगस्ट 1992 ला एका मराठी कुटुंबात नागपूरला झाला होता मृणालचे वडील हे बँकेत मॅनेजर होते. तिने नागपूरतच आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं.
कुम कुम भाग्य सारख्या सुपरहीट हिंदी मालिकेत तिने काम केलं होतं. त्यानंतर तिला मोठी प्रसिद्धी मिळाली होती.
२०१२ साली तिला मुझसे कुछ केहती खामेशियाँ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यातूनच तिने आपली छाप पाडायला सुरुवात केली होती.
हर युग मे आयेगा एक अर्जून, कुम कुम भाग्य अशा मालिकांमध्ये तिने काम केलं. त्यानंतर ती हिंदी टेलिव्हिझनची प्रसिद्ध अभिनेत्री ठरली होती.
मृणालने 2012 साली लव्ह सोनिया चित्रपटात काम केलं होतं. पण तो चित्रपट 2018 साली प्रदर्शित झाला होता. 2019 साली तिला खऱ्या अर्थाने बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधील मिळाली. सुपर 30 या चित्रपटात तिने काम केलं होतं.