मुंबई 31 जुलै : बॉलिवूडचं प्रसिद्ध कपल (Bollywood couple) म्हणून अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोण (Deepika Pdukone) ओळखले जातात. 2018 साली या जोडीने विवाह करून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. गेली अनेक वर्षे ही जोडी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. दरम्यान शनिवारी मुंबईत रणवीर दीपिकाला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाताना दिसला. यामुळे चाहत्यांचा कमेंट्स वर्षाव होतोय. रणवीर स्वतः दीपिकाला मुंबईतील खार येथील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये (Hinduja hospital) घेऊन गेला होता. यावेळी काही मीडिया फोटोग्राफर्सनी त्यांना स्पॉट केलं. त्यामुळे दीपिका आनंदाची बातमी देणार असल्याचं अनुमान त्यांच्या चाहत्यांनी लावलं आहे. (Deepika Padukone pregnancy news)
कंगनाचा ग्लॅमरस अंदाज, हे PHOTO पाहून फॅन म्हणाला- हृतिक तू काय गमावलं आहेस बघ…दीपिका आणि रणवीरच्या विवाहानंतर त्यांचे चाहते या बातमीची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे दीपिका आणि रणवीरला पाहून काहींनी म्हटलं, ‘दीपिका गर्भवती आहे’, तर कोणी म्हटलं ‘अभिनंदन’, ‘छोटा रणवीर येणार’. तर काहींनी सांगितल दीपिका गर्भवती आहेच आणि ती रूटीन चेकअपसाठी आली आहे.
ओ शेठ! देवमाणूसच्या टीमलाही पडली या VIRAL गाण्याची भूरळ; पाहा डॉक्टर-दिव्याची केमिस्ट्रीदरम्यान अनेकांनी ते इतर काही कामासाठी किंवा चेकअपसाठी रुग्णालयात गेले असावेत असही म्हटलं. दीपिका आणि रणवीरची तुफान लोकप्रियता आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीविषयी चाहत्यांना फारच उत्सुकता आहे. तर ही पहिली वेळ नाही जेव्हा दीपिकाच्या प्रेगन्सी विषयी चर्चा रंगल्या आहेत. याआधीही अनेकदा अशा बातम्या पसरल्या होत्या. दीपिका सध्या अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) सोबत ‘पठाण’ (Pathan) चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ज्यात ती ऍक्शन भूमिका साकारणार आहे. यासाठी तिने चांगली ट्रेनिंग देखील घेतली आहे.