दीपिका पदुकोणने केली पुढची घोषणा; Instagram स्टोरीमध्ये काय सांगितलं पाहा

दीपिका पदुकोणने केली पुढची घोषणा; Instagram स्टोरीमध्ये काय सांगितलं पाहा

सोमवारी दीपिकाच्या Instagram story ची चर्चा पुन्हा सुरू झाली.

  • Share this:

मुंबई, 27 जानेवारी : दीपिका पदुकोणच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'छपाक'चं समीक्षकांनी कौतुक केलं आहे. बॉक्स ऑफिसवरच्या कलेक्शनपलीकडे दीपिकाचा या सिनेमाची चर्चा झाली ते त्याच्या आशयामुळे आणि सिनेमा प्रदर्शित होण्याअगोदर दीपिकाने JNU च्या निदर्शकांमध्ये उपस्थिती लावल्यामुळे. सोमवारी दीपिकाच्या Instagram story ची चर्चा पुन्हा सुरू झाली. या इन्स्टा स्टोरीमधून दीपिकाने तिच्या पुढच्या चित्रपटाची घोषणा केली आहे. हॉलिवूडमध्ये गाजलेल्या The Intern या चित्रपटाच्या हिंदी रीमेकमध्ये ती दिसणार आहे. ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्याबरोबर ती या चित्रपटात दिसेल.

द इंटर्न नावाचा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. रॉबर्ट डीनिरो आणि अॅन हाथवे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या हलक्या फुलक्या चित्रपटाने हॉलिवूड गाजवलं होतं. आता उतारवयात पुन्हा एकदा इंटर्नशिपसाठी दाखल होणाऱ्या प्रोफेशनलची भूमिका करणार आहे ऋषी कपूर आणि त्यांची बॉस असेल दीपिका.

 

View this post on Instagram

 

Thrilled to present my next!🎞 The Indian adaptation of #TheIntern A 2021 release! Presented by @_kaproductions @warnerbrosindia and @iamazureent See you at the movies! #RishiKapoor

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दीपिकाने स्वतःच या चित्रपटाची घोषणा इन्स्टाग्राम स्टोरीमधून केली आहे. 2021 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल, असंही तिने म्हटलं आहे.

राजकीय परिस्थितीवर आपल्या उपस्थितीतून भाष्य केल्यानंतर दीपिकावर काही जणांनी टीका केली, तिच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याच्या घोषणाही झाल्या. पण बहुतेकांनी तिच्या धाडसाचं कौतुक केलं. विशेषतः दीपिका या चित्रपटाची निर्मातीसुद्धा असल्याने तिने मोठा धोका पत्करल्याची चर्चा झाली.

आता मात्र दीपिका पुढच्या चित्रपटाकडे वळली आहे हे तिच्या Instagram स्टोरीवरून दिसतं. रणबीर कपूरबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर एवढ्या वर्षांनी पहिल्यांदाच दीपिका ऋषी कपूर यांच्याबरोबर काम करत आहे.

--------------------

अन्य बातम्या

'आता काय दाखवायचं राहिलंय?' प्रियांकाचा ग्रॅमी लुक सोशल मीडियावर झाला ट्रोल

अनुष्का-विराटच्या कमाईत तीनपट वाढ, दोघं मिळून विकत घेऊ शकतात अनेक देश

कोट्यवधींचा मालक असलेल्या सलमानवर कर्ज, किंमत ऐकून व्हाल थक्क

नेहा कक्करनं आर्चीसाठी हिंदीतील सुपरहिट गाणं मराठीत गायलं, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 27, 2020 08:01 PM IST

ताज्या बातम्या