मुंबई, 27 जानेवारी: प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने रिंकू राजगुरूच्या नव्या सिनेमासाठी गाणं गायल्याचं सांगितलं आहे. नेहानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला आहे. या चित्रपटात नेहा कक्करने गायलेलं मिले हो तूम हमको हे गाणं मराठीमध्ये गायलं आहे. नेहाने तिच्या इन्टाग्राम अकांऊटवरून याबाबत माहिती दिली. यासोबतच तिने रिंकूला तिच्या चित्रपटासाठी खूप साऱ्या शुभेच्छाही दिल्या आहेत. नेहाने पहिल्यांदा मराठी गाणं हे रिंकू राजगुरुचा आगामी सिनेमा 'मेकअप'साठी गायलं आहे. सैराट चित्रपटातून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली रिंकू राजगुरू आता लवकरच मेकअप या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा झळकणार आहे.
रिंकू राजगुरू सध्या मेकअप या तिच्या आगामी चित्रपटामध्ये व्यस्त आहे. तिच्यासोबत अभिनेता चिन्मय उदगीरकर स्क्रीन शेअर करणार आहे. खरंतर या सिनेमात रिंकू काय भूमिका साकारणार आहे हे अद्याप गुलदस्त्यात असलं तरी चाहत्यांना मात्र आता सिनेमाची प्रतिक्षा आहे.
मेकअप सिनेमाचं गाठी ग ह्या गाण्यालाही प्रेक्षकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला आहे. मिले हो तुम हमको हे गाणं पुन्हा एकदा नेहा कक्कर पहिल्यांदाच मराठीमध्ये रिंकू राजगुरूच्या मेकअप चित्रपटासाठी गायली आहे. त्यामुळे या मराठी गाण्याला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.