मुंबई, 27 जानेवारी : संगीत क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रॅमी अवॉर्ड सोहळ्याची बातमी यंदा भारतात गाजते आहे ती भलत्याच कारणासाठी. या सोहळ्यासाठी प्रियांका चोप्रा आणि तिचा गायक-संगीतकार पती निक जोनास यांनी हजेरी लावली होती. या खास सोहळ्यासाठी प्रियांकाने निवडलेला डिझायनर ड्रेस सोशल माध्यमामध्ये ट्रोलिंगचा विषय झाला. प्रियांकाने घातलेला जमिनीपर्यंत लोळणारा पांढरा शुभ्र ड्रेस मर्मेड लुक देणारा होता खरा, पण यामध्ये क्लिव्हेज शो होत असल्याने प्रियांकाचे काही चाहते नाराज झाले. प्रियांकाने स्वतःच Instagram वरून या ड्रेसचा फोटो शेअर केला होता. त्याला शेकडो लाइक्सही मिळालेत, पण अनेक भारतीय चाहते तिच्या अंगप्रदर्शनामुळे खवळले. निक आणि प्रियांकाचा फोटो बराच व्हायरल झाला.मसाबा गुप्तासारख्या डिझायनर्सनी या ड्रेसचं कौतुक केलं आहे.
प्रियांका आणि निकने ग्रॅमीच्या रेड कार्पेटसाठी खास तयारी केली होती. राल्फ अँढ रसो (Ralph & Russo ) यांचा डिझायनर हॉट ड्रेस प्रियांकाने घातला आहे. प्लंजिंग नेकलाइनमुळे तो चर्चेचा विषय झाला. या ड्रेसला नाजूक एम्ब्रॉय़री केलेली आहे आणि हिरेही जडवले आहेत.
हा फोटो बघून काही चाहत्यांनी प्रियांकाला भारतीय परंपरा, सभ्यता यांची आठवण करून दिली आहे, तर काहींनी ती हा ड्रेस चांगला कॅरी करतेय असं म्हणत कौतुक केलं आहे. प्रियांका चोप्राच्या या ड्रेसमुळे जगभरातल्या प्रेक्षकांचं तिने लक्ष वेधून घेतलं हे नक्की. आता आणखी काय दाखवायचं राहिलं आहे, अशा अर्थाची प्रतिक्रिया एका यूजरने दिली आहे.