मुंबई, 7 सप्टेंबर: ऑगस्ट 2022 मध्ये मारुती सेलेरियोची वार्षिक मागणी 1094 टक्क्यांनी वाढली. जुलै 2021 मध्ये या हॅचबॅकच्या फक्त 53 युनिट्सची विक्री झाली. तर गेल्या महिन्यात 5,852 कारची विक्री झाली. अशा प्रकारे ऑगस्ट 2022 मध्ये ही सर्वात जास्त मागणी असलेली कार होती. विशेष म्हणजे जास्त मागणीच्या बाबतीत, तिने Baleno, WagonR, Brezza, Nexon, Alto सारख्या टॉप-5 गाड्यांनाही मागं टाकलं आहे. सेलेरियोचं नवीन मॉडेल आल्यानंतर तिची मागणी वाढली आहे. सेलेरिओ ही पेट्रोल आणि सीएनजीमध्ये सर्वाधिक मायलेज देणारी कार आहे. ही कार एका लिटर पेट्रोलमध्ये 26.68 किमी आणि एक किलो सीएनजीमध्ये 35.60 किमी मायलेज देते. तिची एक्स-शोरूम किंमत 5.25 लाख रुपये आहे. पूर्ण टँकमध्ये 853Km प्रवास करू शकतील- मारुती सेलेरियोमध्ये 32 लीटरची इंधन टाकी देण्यात आली आहे. म्हणजेच, जर तुम्ही ती भरली तर 26.68 km/l नुसार तुम्ही 853Km प्रवास करू शकाल. म्हणजेच तुम्ही दिल्लीहून भोपाळला जात असाल तर वाटेत पेट्रोल टाकण्याची गरज भासणार नाही. मारुती सेलेरियोवर 50 हजारांची सूट- या महिन्यात, Celerio च्या पेट्रोल MT प्रकार Vxi, Zxi, Zxi+ वर 50,000 रुपयांचा फायदा मिळेल. यामध्ये 35,000 रुपयांची रोख सवलत आणि 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे. त्याचप्रमाणे, पेट्रोल एएमटी प्रकार खरेदी केल्यास 25,000 रुपयांचा फायदा मिळेल. यामध्ये 10,000 रुपयांची रोख सूट आणि 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे. मारुती सेलेरियो इंजिन- नवीन Celerio नवीन K10C DualJet 1.0-लीटर तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे. हे स्टार्ट/स्टॉप सिस्टमसह येते. हे इंजिन 66 एचपी पॉवर आणि 89 एनएम टॉर्क जनरेट करते. हे सध्याच्या मॉडेलपेक्षा 2 hp पॉवर आणि 1 Nm टॉर्क कमी जनरेट करते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT गिअरबॉक्सशी जोडलेली आहे. तिच्या LXI प्रकारात ऑटोमॅटिक ट्रान्समिशन उपलब्ध होणार नाही. कंपनीचा दावा आहे की, या कारचं मायलेज 26.68 kmpl आहे, जे सध्याच्या मॉडेलपेक्षा 23 टक्के जास्त आहे. हेही वाचा- Two Wheeler Loan Tips: दुचाकीसाठी कर्ज घेण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी, नाहीतर होईल नुकसान मारुती सेलेरियोचं एक्सटीरियर- सेलेरिओला नवीन 3D स्कल्प्टेड एक्सटीरिअर बॉडी प्रोफाईलसह फ्रंट ग्रिल, शार्प हेडलाइट युनिट आणि फॉग लाईट केसिंग देण्यात आलं आहे. काळ्या अॅक्सेंटसह फ्रंट बंपर देखील नवीन आहे. त्यातील काही घटक एस-प्रेसोमधूनही घेतले आहेत. जुन्या मॉडेलच्या तुलनेत कारची साइड प्रोफाइल देखील पूर्णपणे वेगळी दिसते. कारला नवीन डिझाइनसह 15-इंच अलॉय व्हील आहेत. मागील बाजूस, तुम्हाला बॉडी कलरचे मागील बंपर, फ्लुइड लुकिंग टेललाइट्स आणि कर्व्ही टेलगेट मिळतात. मारुती सेलेरियोचे इंटीरियर- नव्या सेलेरियोमध्ये प्रवाशांना अधिक जागा मिळणार आहे. कारच्या आत, फर्स्ट-इन-सेगमेंट हिल होल्ड असिस्ट, इंजिन स्टार्ट-स्टॉप, मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन यासारखी वैशिष्ट्ये उपलब्ध असतील. कारला शार्प डॅश लाइन्स, क्रोम अॅक्सेंटसह ट्विन-स्लॉट एसी व्हेंट्स, नवीन गीअर शिफ्ट डिझाइन आणि अपहोल्स्ट्रीसाठी नवीन डिझाइन देण्यात आलं आहे. यात Apple CarPlay आणि Android Auto साठी सपोर्ट असलेला 7-इंचाचा स्मार्टप्ले स्टुडिओ डिस्प्ले आहे. मारुती सेलेरियोची सुरक्षा वैशिष्ट्ये- या कारमध्ये ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS, हिल होल्ड असिस्ट (फर्स्ट-इन सेगमेंट) सह एकूण 12 सुरक्षा वैशिष्ट्ये मिळतील. कंपनीचा दावा आहे की नवीन सेलेरिओ फ्रंटल-ऑफसेट, साइड क्रॅश आणि पादचारी सुरक्षा यासारख्या सर्व भारतीय सुरक्षा नियमांचं पालन करते. सॉलिड फायर रेड आणि स्पीडी ब्लू यासह आर्क्टिक व्हाईट, सिल्की सिल्व्हर, ग्लिस्टेनिंग ग्रे, कॅफीन ब्राउन, रेड आणि ब्लू या सहा रंगांमध्ये ही कार उपलब्ध असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.