कनिकाच्या पाचव्या कोरोना व्हायरस टेस्टचा रिपोर्ट समोर, रुग्णालयाने दिले नवे अपडेट

कनिकाच्या पाचव्या कोरोना व्हायरस टेस्टचा रिपोर्ट समोर, रुग्णालयाने दिले नवे अपडेट

कनिकाच्या याआधीच्या चार कोरोना टेस्ट झाल्या होत्या. त्यात रिपोर्ट प़ॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 एप्रिल : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरला कोरोना झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर सातत्यानं तिच्या टेस्ट होत आहेत. आता पुन्हा एकदा तिची पाचवी टेस्ट झाली असून त्याबाबतचे अपडेट रुग्णालयाकडून देण्यात आले आहेत. याआधी तिच्या चार कोरोना टेस्ट झाल्या होत्या. त्यात कनिका प़ॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर इन्स्टाग्रामवर पोस्ट करून कनिकाने तब्येतीची माहिती दिली होती.

कनिका म्हणाली होती की, पहिल्यापेक्षा आता तब्येत चांगली आहे. मला आशा आहे की पुढची टेस्ट निगेटिव्ह येईल. त्यानंतर आता कनिकाची पाचवी टेस्ट झाली असून त्यात रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मात्र तरीही तिला पुढचे काही दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याची  माहिती डॉक्टरांनी दिली आङे.

बेबी डॉल फेम गायिका कनिकाच्या तब्येतीबाबतची माहिती संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे संचालक डॉक्टर आर के धीमान यांनी दिली. त्यांनी सांगितलं की, कनिका कपूरमध्ये आता कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. तिची तब्येत आता स्थिर असून चांगली आहे. सर्वसामान्यपणे अन्न खाऊ शकते. माध्यमात तिच्या प्रकृतीबद्दल अनेक अफवा पसरल्या आहेत त्या खोट्या आहेत.

हे वाचा : किराणा-भाजी घेऊन घरी आल्यावर काय-काय करायचं? हीना खानची शिकवणी तुफान हिट

कनिका 9 मार्चला लंडनहून मुंबईत आली होती. त्यानंतर दोन दिवसांनी लखनऊ इथं काही पार्ट्यांना तिनं हजेरी लावली होती. तिच्या बेजबाबदारपणाबद्दल उत्तर प्रदेशात तिच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत. भारतात जन्म झालेली कनिका आता इंग्लंडची नागरिक आहे.

हे वाचा : घटस्फोटाच्या रात्री काय घडलं? मलायका अरोरानं तब्बल 4 वर्षांनंतर केला खुलासा

First published: April 4, 2020, 8:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading