मुंबई, 12 मार्च : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या मैत्रीचे किस्से तर सर्वांनाच माहित आहे. सलमान एक अशी व्यक्ती आहे जो मैत्री आणि दुश्मनी दोन्हीही इमानदारीनं निभवतो असं म्हटलं जातं. त्याच्या लव्ह लाइफबद्दलच्या चर्चा तर बी टाऊनमध्ये नव्या नाहीत. त्याच्या आतापर्यंतच्या बॉलिवूड कारकिर्दित अनेक अभिनेत्रींशी त्याचं नाव जोडलं गेलं. मात्र भाईजान अद्याप सिंगल आहे. पण सलमानवरुन एक डान्स कोरिओग्राफर आपल्या गर्लफ्रेंडवर संशय घेत असे अशी माहिती नुकतीच समोर आली आहे. विशेष म्हणजे या कोरिग्राफरच्या गर्लफ्रेंडनं स्वतःच या गोष्टीचा खुलासा केला आहे. बिग बॉस फेम अभिनेत्री सना खान आणि तिचा बॉयफ्रेंड मेल्विन लुईस यांचं काही महिन्यांपूर्वीच ब्रेकअप झालं आहे. त्यानंतर सनानं मेल्विनवर तिला मारहाण करण्यासोबत अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता तिनं मेल्विन बद्दल आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. मेल्विन सलमान खानवरुन सनावर संशय घेत असे आणि तो नेहमीच तिला सलमानपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असे असा खुलासा सनानं नुकताच एका मुलाखतीत केला आहे. हे वाचा- रणवीरला झालाय गंभीर आजार, दीपिकाच्या सोशल मीडिया पोस्टमधून झाला खुलासा बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत सना म्हणाली, सलमान खान आणि माझं एक वेगळं सुंदर नातं आहे. त्यानं नेहमीच मला सन्मानानं वागवलं आहे. तो नेहमीच मला माझ्या भावासारखा आहे. मी त्याला कधीही राखी बांधू शकते. त्याचा भाऊ सोहेलसोबतही माझे चांगले संबंध आहेत. सना पुढे म्हणाली, ‘मेल्विनच्या डोक्यात नेहमीच एकाच प्रकारचे विचार येत असत. एकदा मला ‘जुम्मे की रात है’ या गाण्यावर लहानसा परफॉर्मन्स द्यायचा होता. त्यावर त्यानं मला असंख्य प्रश्न विचारले. माझ्यावर संशय घेतला आणि मी खोटं बोलत असल्याचेही आरोप केले.’ सना खाननं 2014 मध्ये रिलीज झालेल्या जय हो सिनेमात सलमानसोबत काम केलं होतं. त्याआधी ती बिग बॉसमध्ये दिसली होती. हा शो सलमाननं होस्ट केला होता. हे वाचा- राकुल प्रीत सिंहनं भिंतीवर उलटं लटकून घातला टी-शर्ट, Video पाहून व्हाल अवाक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.