बॉलिवूडमध्ये सध्या स्टार किड्सची जोरदार चर्चा आहे. या पैकीच एक आहे अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर.
सध्या तरी बॉलिवूड पदार्पणाबद्दल काहीही न बोलणारी शनाया कपूर सोशल मीडियावर मात्र खूप सक्रिय आहे. ती नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.
मात्र यावेळी शनाया कपूरचे काही फोटो खुद्द तिच्या बाबांनी म्हणजेच संजय कपूरनं शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती एवढी सुंदर दिसत आहे की पाहणाऱ्याची नजर हटणारच नाही.
या फोटोमध्ये शनाया व्हाइट क्रॉप टॉप आणि ब्लॅक जीन्समध्ये दिसत आहे. यासोबत तिनं व्हाइट आणि मस्टर्ड कलरचं जॅकेट सुद्धा कॅरी केलं आहे.
पण या सर्वांत विशेष आहे ते म्हणजे शनायानं दिलेले एक्स्प्रेशन्स. ज्या आत्मविश्वासानं तिनं कॅमरेला पोज दिल्या आहे. ते पाहता ती भविष्यात चांगली अभिनेत्री नक्कीच होऊ शकते.
सध्या शनाया तिची चुलत बहीण जान्हवी कपूरचा आगामी सिनेमा ‘गुंजन सक्सेना : द कारगील गर्ल’साठी दिग्दर्शक शरण शर्माला असिस्ट करत आहे.