'लस घ्यायला चुकून सुद्धा इथे जाऊ नका'; 'देवमाणसा'ने दिलाय इशारा

'लस घ्यायला चुकून सुद्धा इथे जाऊ नका'; 'देवमाणसा'ने दिलाय इशारा

आता शासनाने 18 वर्षांवरील सगळ्यांनाच लस देण्याची मुभा दिली आहे. 1 मे पासून हे लसीकरण सुरू झालं आहे. पण झी मराठीने (Zee Marathi) लसीकरणासाठी एक सल्ला दिलाय.

  • Share this:

मुंबई 10 मे : सध्या देशभरात कोरोनाचं (corona) लसीकरण (Vaccination) सुरू आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा प्रकोप ही सुरूच आहे. कोरोनाची परिस्थिती सगळीकडे खालावत चालली आहे. अनेकांना कोरोनाची लागण ही झाली आहे. तर आता शासनाने 18 वर्षांवरील सगळ्यांनाच लस देण्याची मुभा दिली आहे. 1 मे पासून हे लसीकरण सुरू झालं आहे. पण झी मराठीने (Zee Marathi) लसीकरणासाठी एक सल्ला दिलाय.

झी मराठी वाहिनी वर सध्या ‘देवमाणूस’ (Devmanus) ही लोकप्रिय मालिका सुरू आहे. यात एक बोगस डॉक्टर कशाप्रकारे निष्पाप लोकांची दिशाभूल करतो. तर लोकांच्या आरोग्याशीही कशाप्रकारे खेळतो हे दाखवण्यात आलं आहे.

अगं बाई.. अरेच्चा! केदार शिंदे दुसऱ्यांदा अडकले विवाह बंधनात, 25 वर्षांनी पूर्ण झाली हौस

तर यालाच अनुसरून झी मराठीने एक पोस्ट केली आहे. या पोस्ट मध्ये एका ठिकाणी लसीकरण केंद्र दाखवण्यात आलं आहे. तर दुसरीकडे डॉक्टर अजित कुमार देव या बोगस डॉक्टरचा दवाखाना दाखवण्यात आला आहे. तर लस घ्यायला लसीकरण केंद्रावरच जा व बोगस डॉक्टकडे जाऊ नका अस सांगण्यात आलं आहे.

सध्या देवमाणूस ही मालिका फार चर्चेत आहे. देवमाणूस म्हणजेच बोगस डॉक्टर ला पोलिस कधी पकडणार याची प्रेक्षक वाट पाहत आहेत. पण डॉक्टर मात्र वेळोवेळी पोलिसांना चकवा देत आहे. तर पुरावे देखिल गायब करत आहे. त्यामुळे आता पोलिस देखिल हतबल झाले आहे. पण आता एसीपी दिव्याने नवा प्लॅन आखला आहे. त्यामुळे आता दिव्या कधी ड़ॉक्टरला पकडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सध्या झी मराठीच्या मालिकांचं शुटींग हे राज्याबाहेर सुरू आहे. तर देवमाणूस ही मालिका बेळगाव मध्ये चित्रित होत आहे.

Published by: News Digital
First published: May 10, 2021, 8:48 PM IST

ताज्या बातम्या