जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Corona Positive कनिकाचे हॉस्पिटलमध्येही ‘नखरे’, डॉक्टर्सची डोकेदुखी वाढली

Corona Positive कनिकाचे हॉस्पिटलमध्येही ‘नखरे’, डॉक्टर्सची डोकेदुखी वाढली

Corona Positive कनिकाचे हॉस्पिटलमध्येही ‘नखरे’, डॉक्टर्सची डोकेदुखी वाढली

कनिका कपूर सध्या लखनऊच्या एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. मात्र तिच्या वागणूकीमुळे सध्या या हॉस्पिटलचा पूर्ण स्टाफ वैतागला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 22 मार्च : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं निदान झाल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. कारण तिला कोरोनाचं निदान होण्याआधी तिनं एका हायप्रोफाइल पार्टीमध्ये हजेरी लावली होती. त्यामुळे सध्या पार्टीत सहभागी झालेले सर्व लोक सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. कनिकावर सर्वजण लोकांच्या आरोग्याशी खेळल्याचा आरोप करताना दिसत आहेत. दरम्यान कनिकावर FIR सुद्धा दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर कनिकाबाबत आता नवी माहिती समोर आली आहे. कनिका ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. त्या ठिकाणचा स्टाफ तिच्या नखऱ्यांमुळे वैतागला आहे. या हॉस्पिटलच्या डायरेक्टरनं स्वतः याबाबत माहिती दिली आहे. कनिका कपूर सध्या लखनऊच्या एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. मात्र तिच्या वागणूकीमुळे सध्या या हॉस्पिटलचा पूर्ण स्टाफ वैतागला आहे. लखनऊच्या संजय गांधी पोस्ट ग्रेजुएट इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (SGPGI)च्या डायरेक्टरनं कनिकावर आरोप केला आहे की, ती तिच्या उपचारामध्ये हॉस्पिटल स्टाफला सहकार्य करत नाही. डायरेक्टरचं म्हणणं आहे की, कनिकासाठी सर्व चांगल्या सुविधा देण्यात आल्या आहेत. तिचा आयसोलेशन रूम एअर कंडिशन आहे. ज्यात टॉयलेट, पेशंट बेड आणि टीव्ही आहे. याशिवाय तिला कॅन्टिनमधून तिला ग्लूटन फ्रि जेवण दिलं जात आहे. मात्र तरीही तिचं स्टाफशी वागणं चांगलं नाही. ती हॉस्पिटलमध्ये असं वागते की, ती पेशंट नाही तर एखादी स्टार आहे. ज्यामुळे सध्या हॉस्पिटल स्टाफ वैतागला आहे. Coronavirus Outbreak दरम्यान मलायका करतेय खास काम, Video शेअर करून म्हणाली…

जाहिरात

काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत कनिकानं हॉस्पिटलच्या स्टाफवर बरेच आरोप केले आहेत. यात तिनं सांगितलं की, हॉस्पिटलचे डॉक्टर तिला धमकी देत आहेत की तिनं मोठा गुन्हा केला आहे. तू कोणतीही तपासणी न करता एअरपोर्टवरून पळून आली आहेस. याशिवाय आपल्याला इथे खायला-प्यायलाही देत नसल्याचंही तिनं म्हटलं होतं. अंकिता लोखंडे मारतेय चक्क आरशासोबत गप्पा! बाथरोबमध्ये दिसला BOLD अंदाज लंडनवरून परतलेल्या कनिका कपूरवर आरोप आहे की, तिनं एअरपोर्टवर कोरोना तपासणी केली नव्हती या तपासणीपासून वाचण्यासाठी ती बाथरुममध्ये लपून राहिली. त्यानंतर ती लखनऊच्या एका हायप्रोफाइल पार्टीमध्ये सहभागी झाली होती. ज्यात अनेक राजकीय व्यक्ती सुद्धा सहभागी झाल्या होत्या. या पार्टीनंतर तिचा तब्येत बिघडली आणि तिची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली. अमेरिकेतून परतल्यावर अनुपम खेर यांनी केलं असं काही की आई झाली नाराज

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood
  • First Published :
जाहिरात
जाहिरात