मुंबई, 29 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. काँग्रेस-भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या प्रकरणात चित्रपट निर्माता आणि सुशांतचा मित्र असणाऱ्या ‘संदीप सिंह’चे नाव आता चर्चेत येऊ लागले आहे. संदीपचे भाजपशी कनेक्शन असल्याचा दावा केला जात आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी संदीप सिंहवर निशाणा साधत असे म्हटले आहे की, ‘1 डिसेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीमध्ये संदीपने (मीडिया अहवालानुसार तो लंडनला पळून जाणार होता) महाराष्ट्र भाजप कार्यालयामध्ये केलेले 53 फोनकॉल्स कुणाला केले? तो कुणाशी बोलत होता? त्याचा भाजपमधील हँडलर कोण आहे?’ या सर्व प्रकरणातील भाजप कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सचिन सावंत यांनी दुसरे ट्वीट केले आहे की, ‘संदीप सिंहवर भारतीय दुतावासाकडून आयोजित मॉरिशस भेटीदरम्यानच्या कार्यक्रमात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्या प्रक्रणाचे स्टेटस काय आहे? त्याला मोदी सरकारने मदत केली का? ज्याच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप आहेत अशा माणसाची निवड भाजपने मोदीजींवरील बायोपिक बनवण्यासाठी का केली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याला पाठिंबा का दिला?’
2) Sandeep was accused of sexually assaulting a minor in 2018 in Mauritius in his Indian Embassy-backed visit. What’s d status of case? Was he helped by Modi govt?
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 29, 2020
3)Why a man accused of sexually assaulting a minor was chosen by BJP to make ModiJi's biopic & supported by then CM? pic.twitter.com/0q05Z4YcnT
सचिन सावंत यांनी आणखी एक ट्वीट करत गुजरात सरकारवर देखील निशाणा साधला आहे. यामध्ये ते म्हणाले आहेत की, ‘व्हायब्रंट गुजरात समीटमध्ये मोदींवर बोयपिक करणाऱ्या संदीप सिंहच्या लिजेंड ग्लोबल स्टुडिओबरोबर गुजरात सरकारने 177 कोटींचा करार केला. या करारासाठी केवळ संदीपच्या कंपनीची का निवड झाली? इतरांची का नाही? संदीप भाजपचा सर्वात लाडका का आहे?’
4) Ensuing Modi ji's biopic, Sandeep SSingh's Legend Global Studio was the only film company which signed MOU worth ₹177 crores with Gujarat govt in Vibrant Gujarat summit. Why only Sandeep's company & not others? What makes him a blue eyed boy of BJP? https://t.co/bJRqjDmHdR pic.twitter.com/vEybLVXEin
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 29, 2020
संदीप सिंह हा ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचा निर्माता आहे. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही संदीप सिंहचे फोटो आहेत. त्यामुळे संदीप सिंह यांचे भाजप कनेक्शन काय आहे? असा सवाल काँग्रेसनं केला आहे. (हे वाचा- रडत रियाने सांगितली तिची कहाणी, का म्हणाली-भट्ट सर त्याने मला घराबाहेर काढलं) सुशांतसिंह प्रकरणात संदीप सिंहवरही मास्टरमाईंड असल्याचा गंभीर आरोप होत आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या चॅटवरुन ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर भाजपकडून सरकारवर हल्लाबोल सुरु आहे. त्यात काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी संदीप सिंहचे फडणवीसांसोबतचे फोटो शेअर करुन, भाजपच्या अँगलवरुनही चौकशी करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना विनंती आहे, भाजप अँगल तपासून घ्यावा. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआय संदीप सिंह यांची चौकशी करणार आहे.संदीप सिंहचं भाजप कनेक्शनही तपासावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. (हे वाचा- ‘मी सिद्धार्थ पिठानी…’, सुशांतच्या मित्राचा जबाब न्यूज18 लोकमतच्या हाती ) देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सांवत यांच्यावरही यावेळी निशाणा साधला. संदीप सिंह हे बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जो सिनेमा झाला त्याचेही निर्माते आहेत. एखाद्या कार्यक्रमात माझा त्यांच्यासोबत फोटो असेल, त्यावर राजकारण करण्यासारखं काहीही नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबई पोलिसांनी संदीप सिंह यांची चौकशी का केली नाही? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला.