मुंबई, 15 जुलै : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे गेली अनेक दिवस स्क्रिनपासून लांब आहेत. नाटक, सिनेमा, मालिकेत काम करणारे अतुल परचुरे गेली वर्षभर कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचा सामना करत होते. कॅन्सरवर त्यांनी यशस्वी मात केली असून पुन्हा नव्या जोमानं ते कामाला लागले आहेत. अतुल परचुरे यांच्या लिव्हरमध्ये एक ट्युमर होता. अतुल यांच्या आयुष्यात सगळं व्यवस्थित सुरू असताना त्यांना कॅन्सरचं निदान झालं. हा काळ त्यांच्यासाठी खूप कठीण होता. पण यात त्यांना पत्नी सोनिया परचुरे, मुलगी आणि आईची खंबीर साथ मिळाली. अतुल यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या आजारपणाचा खुलासा केला. ऑस्ट्रेलियात फिरण्यासाठी गेले होते अतुल आणि त्यांची पत्नी सोनिया यांच्या लग्नाचा 25वा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते गेले होते. तिथे त्यांना सर्वात प्रथम त्रास होऊ लागला. त्यांना जेवण खाल्लं जात नव्हतं. सुरूवातीला त्यांना कावीळचं लक्षण असल्याचं जाणवलं. भारतात परत आल्यानंतर ते डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी त्यांची सोनोग्राफी केली. सोनोग्राफी करत असतानाच डॉक्टरांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून त्यांना कळलं होतं की काहीतरी गडबड आहे. रिपोर्टमध्ये अतुल परचुरे यांच्या लिव्हरच्या इथे ट्युमर असल्याचं समोर आलं. हेही वाचा - ‘आम्ही एका जिममधे वर्कआउट करायचो…’ रूपाली भोसलेने शेअर केले रवींद्र महाजनी यांचे कधीही न पाहिलेले फोटो आई, बायको अन् लेकीनं दिली खंबीर साथ अतुल परचुरे यांच्या ट्रिटमेंटच्या काळात त्यांच्या आई, बायको आणि मुलीने त्यांना खूप मोलाची साथ दिली. ते म्हणाले, “मी आजारी आहे. मला काही तरी झालं आहे असं त्यांनी मला कधीच जाणवू दिलं नाही. कॅन्सर असल्याचं निदान झाल्यानंतर मी घरी गेलो आणि पहिल्यांदा आईला सांगितलं तेव्हा आई म्हणाली, काही होणार नाही तुला. ट्युमर काढून टाकल्यानंतर सगळं व्यवस्थित होणार आहे ना, असं ती म्हणाली”. चुकीच्या ट्रिटमेंटमुळे खालावली ट्रिटमेंट कॅन्सरचं निदान झाल्यानंतर अतुल परचुरे ट्रिटमेंटसाठी एका रुग्णालयात भरती झाले होते. पण सुरुवातीलाच त्यांनी चुकीची ट्रिटमेंट मिळाली. अतुल परचुरे म्हणाले, “चुकीच्या ट्रीटमेंटमुळं खरं तर तब्येत आणखी बिघडली होती. चालताही येत नव्हतं. माझे पाय सुजले होते. बोलताना मी अडखळायचो”.
डॉक्टर म्हणाले जिवंत राहणार नाही “चुकीच्या ट्रिटमेंटमुळे मला त्रास होऊ लागल्याने त्यांनी मला घरी पाठवलं. ट्रिटमेंटमध्ये काहीतरी चुकलंय हे समोर आल्यानंतर त्यांनी खूप सारवासारव केली. पण त्यांच्याशी भांडायला आम्हाला त्यातलं काही कळत नव्हतं आणि आम्ही ते सिद्ध करू शकत नव्हतो”, असं अतुल परचुरे म्हणाले. त्याचप्रमाणे “माझी तब्येत बिघलेली असताना त्यांनी मला दीड महिने थांबा असं सांगितलं. सर्जरी केली की तुम्हाला बरेच वर्षे कावीळ होईल, तुमच्या लिव्हरमध्ये पाणी होईल, किंवा तुम्ही जिवंत राहणार नाही”, असं सांगितलं. डॉक्टरांच्या फसवणूकीनंतर अतुल परचुरे यांनी दुसऱ्या डॉक्टरचा सल्ला घेतला. नवी ट्रिटमेंट सुरू केली. उपचारांती अतुल परचुरे यांचं आयुष्य बदललं, असं त्यांनी सांगितलं.