मराठी अभिनेते रवींद्र हनुमंत महाजनी यांच निधन झालं आहे.मावळच्या तळेगाव दाभाडील आंबी येथील घरात शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला.
वींद्र यांचं वय 77 वर्ष होतं. त्यांचा मृत्यू साधारण: तीन दिवसांपूर्वी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.त्यांच्या मृतदेह अशा अवस्थेत आढळल्याने सर्वानाच धक्का बसला आहे.
लोकप्रिय अभिनेत्याचा असा शेवट झाला आहे, हे खूपच वेदनादायी आहे. त्यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येतोय. मराठमोळी अभिनेत्री रूपाली भोसले हिनं देखील त्यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. शिवाय रूपाली आणि रवींद्र महाजनी हे एकाच जीममध्ये वर्कआऊट करायचे हे देखील तिनं सांगितलं आहे.
रूपाली भोसलेनं पोस्टमध्ये म्हटलं आहे की,आम्ही एका जिममधे वर्कआउट करायचो प्लस माला काकांच्यासोबत एका सिनेमात काम करण्याची संधी देखील मिळाली.
त्यांची जी स्टाइल होती ती त्यांनी कायम तशीच ठेवली, मी त्यांना कधीही भेटले की हॅण्डसम हंक आसचं म्हणायचे. माझ्या आईला ते खूप आवडायचे. माझ्या वडिलांनी त्यांच्या मुंबईचा फौजदार हा त्यांचा सिनेमाचं बॅनरची प्रिंट माझ्या वडिलांनी केली होती.
त्यांची आणि पप्पांची भेट झाली नाही, पण म्हणतात ना जीवन एक सर्कल आहे, आणि मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.