मुंबई, 3 ऑगस्ट- कॉमेडीयन आणि अभिनेता सुनील ग्रोवर (Sunil Grover) आज मनोरंजन क्षेत्रातील एक ओळखीचा चेहरा बनला आहे. त्याने प्रत्येकवेळी प्रेक्षकांना हसवून लोटपोट केलं आहे. त्याच्या कॉमेडीचे लाखो लोक चाहते आहेत. त्यामुळे सुनीलचं फक्त नाव जरी घेतलं तरी, चाहत्यांना चेहऱ्यावर हास्य उमटत. आज सुनील आपला वाढदिवस(Birthday) साजरा करत आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याबद्दल काही खास गोष्टी.
View this post on Instagram
कॉमेडीयन सुनील ग्रोवरचा जन्म 3 ऑगस्ट 1977 साली हरियाणामधील सिरसा येथे झाला होता. कॉमेडीयन सुनीलने रेडिओ, टीव्ही ते आत्ता वेबसिरीज असा प्रवास केला आहे. हरियाणवी-पंजाबी असणाऱ्या सुनीलने छोट्या पडद्यावर गुत्थी, डॉ. मशहूर गुलाठी, रिंकू भाभी अशा अनेक भूमिका साकारल्या आहेत. सुनील ग्रोवर जितका चांगला कॉमेडी करतो. तितकचं सुंदर मिमिक्रीसुद्धा करतो. त्याने अनेकवेळा बिग बी अमिताभ बच्चन यांची भमिका साकारली आहे. आणि यामध्ये त्याने हुबहू बिग बीसारखा आवाजदेखील काढला आहे.
(हे वाचा: नवाजुद्दीन सिद्दीकी सोडणार भारत? पत्नी आलिया म्हणाली, ‘आम्ही...’)
सुनीलने आपल्या करीयरची सुरुवात सर्वप्रथम रेडिओपासून केली होती. त्यानंतर त्याने टीव्हीकडे आपला मोर्चा वळवला होता. तसेच मध्यंतरी त्याने रिंकू भाभी या फेमस भूमिकेत एक व्हिडीओ सॉंगसुद्धा केलं होतं. या विनोदी गाण्याला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता.यातील सुनीलच्या विनोदी अभिनयाने चाहत्यांना हसवून लोटपोट केलं होतं. आजही हे गाणं खुपचं आंनदाने बघितलं जातं.
(हे वाचा:ग्लॅमर की कपड्याची बचत?’ 2.0 लुकमुळे रश्मी देसाई ट्रोल )
सुनीलने ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये गुत्थीची भूमिका साकारून चाहत्यांच्या मनाला भुरळ पडली होती. त्याच्या उत्कृष्ट कॉमेडीने प्रेकक्षकांना पोटधरून हसायला भाग पाडलं होतं. त्यानंतर त्याने ‘कॉमेडी नाईटस विथ कपिल’ मध्ये डॉ.मशहूर गुलाठीची भूमिका साकारून चाहत्यांना पुन्हा एकदा हसायला भाग पाडलं होतं. त्याने आपल्या प्रत्येक भूमिकेत प्राण ओतलं होतं. त्याच्या या प्रामाणिक प्रयत्नांमुळेचं आज त्याला मनोरंजन जगतातील एक लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखलं जातं. नुकताच सुनील ग्रोवर ‘तांडव’ या वेबसिरीजमध्ये दिसला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Sunil grover