मुंबई 12 जुलै: कॉमेडियन वीर दास (Vir Das) आणि कॉंट्रोव्हर्सी यांचं नातं खूप जुनं आहे. हा स्टॅन्ड अप कॉमेडियन (stand up comedian Vir Das) त्याच्या अनेक वक्तव्यांमुळे कायम चर्चेत येत असतो. त्याने एक व्हिडिओ शेअर करत पुन्हा देशाची खिल्ली उडवल्याचं दिसून आलं आहे. भावना दुखावणाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईवर निशाणा साधत तो बोलताना दिसला. या व्हिडिओमध्ये तो सांगतो की ‘देशात कोणलाही कधीही थोबाडीत मारली जाऊ शकते. कोणी मारलं असं विचारण्याऐवजी का मारलं हे जास्त विचारलं जातं. यावर स्वतःच उत्तर देत तो सांगतो, देशद्रोह, मानहानी, भावना दुखावल्या गेल्याबद्दल कोणालाही श्रीमुखात भडकवली जाऊ शकते.’ वीर दासने सोमवारी एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ त्याच्या एका जुन्या शोमधील एक क्लिप आहे. या व्हिडिओमध्ये त्याने असं सांगायचा प्रयत्न केला की भारतात भवन दुखवण्याचा नावाखाली तुम्हाला कोणीही येऊन थोबाडीत लगावून जाऊ शकतं किंवा शिक्षा होऊ शकते. त्याच्या या व्हिडिओला 6 हजाराहून जास्त लाईक्स मिळाले आहेत. तसंच बऱ्याच कमेंट्स सुद्धा आल्याचं पाहायला मिळत आहे. हे ही वाचा- Ranveer ने ‘या’ ठिकाणी साजरा केला त्याचा 37 वा वाढदिवस, दीपिकानं शेअर केले खास फोटो लोकांची संमिश्र प्रतिक्रिया वीर दासच्या या नव्या व्हिडिओवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्याचं दिसून येत आहे. एक युजर असं लिहितो, “म्हणजे तुमच्यामते भावना दुखवल्याच्या नावाखाली नुपूर शर्मा यांना अटक झाली पाहिजे आणि अश्लील कॉमेडी करणाऱ्या स्टॅन्ड अप कॉमेडियनना मात्र सोडून दिलं पाहिजे. हा कोणता दुतोंडीपणा?” अजून एक युजर असं लोहितो, “जर भारतीय संस्कृती, देवतांबद्दल आणि हिंदू धर्माबद्दल अश्लील वक्तव्य करायला स्वातंत्र्य आहे मग हीच हिंमत बाकीच्या धर्मांबद्दल करून का नाही दाखवत? का तेव्हा गळा कापला जायची भीती वाटते?”
वीर दास हा त्याच्या अनेक वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहिला आहे. त्याने मागे एकदा अमेरिकेतील शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं होतं जयवरून त्याच्यावर जबर टीका झाली होती तसंच त्याच्यावर कारवाईची सुद्धा मागणी करण्यात आली होती.

)







