मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'समोर एकेक हत्यार ठेवलं जात होतं अन्...'; भाऊ कदमनं सांगितला Timepass3 मधील तो किस्सा

'समोर एकेक हत्यार ठेवलं जात होतं अन्...'; भाऊ कदमनं सांगितला Timepass3 मधील तो किस्सा

भाऊ कदम

भाऊ कदम

टाइमपास 3 वेगळा होता. या सिनेमात अनेक नवी पात्र आणि ट्विस्ट आणि अँक्शन सीन्स होते. दरम्यान भाऊ कदमसमोर समोर एकेक हत्यार ठेवलं जात होतं आणि त्यात त्याला सीन द्यायचा होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई,  16 नोव्हेंबर : आपल्या दमदार अभिनयानं आणि विनोदानं प्रेक्षकांना  खळखळून हसवणारा अभिनेता म्हणजे भाऊ कदम.  कलाकार एखादा कॉमेडी सीन कसा करत असतील? आपण न हसता विनोदाचं टायमिंग पकडत कॉमेडी सीन करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असतं. असा एक भन्नाट सीन टाइमपास 3 या सिनेमात पहायला मिळतो. भाऊ कदमनं टाइमपासचे तिन्ही भाग त्याच्या उत्तम अभिनय आणि टायमिंगनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले.  साध्या सरळ , रिक्षाचालक  असलेल्या शांताराम परब प्रेक्षकांना प्रचंड आवडला. पण टाइमपासच्या तिसऱ्या भागात भाऊला मात्र जरा जास्त मेहनत घ्यावी लागली असं म्हणावं लागेल. दोन्ही पार्टपेक्षा टाइमपास 3 वेगळा होता. या सिनेमात अनेक नवी पात्र आणि ट्विस्ट आणि अँक्शन सीन्स होते. दरम्यान भाऊ कदमसमोर समोर एकेक हत्यार ठेवलं जात होतं आणि त्यात त्याला सीन द्यायचा होता.

टाइमपास 3 या सिनेमातील भाऊ कदम आणि संजय नार्वेकरसमोर आले.  डेंजरडॉन दिनकर पाटील एकेक हत्यार समोर ठेवत असताना चेहऱ्यावर भीती आणि ओठावर दाबून ठेवलेलं हसू अशी गोची भाऊची पंचायत झाली होती.

टाइमपास 3 मध्ये दगडू सभ्य झाल्यामुळे शांताराचं हे स्वप्नं पूर्ण झालंय. सभ्य दगडूच्या आयुष्यात येणारी डेंजर डॉनची मुलगी पालवी, डॉन आणि शांताराम यांच्यातील नव्या नात्याची सुरूवात दाखवणारे सीन भाऊने कमाल केले आहेत. रविवारी 20 नोव्हेंबरला दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता टाइमपास 3 हा सिनेमा झी टॉकिजवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

हेही वाचा - तुम्हालाही करायला आवडेल; भाऊ-कुशलने दाखवलं भन्नाट योगासन

या सिनेमाच्या निमित्ताने भाऊ कदमनं एक किस्सा शेअर केलाय. तो म्हणाला, 'टाइमपास ३ हा सिनेमा जितका प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा आहे तितकाच आम्हा कलाकारांनाही तो शूट करताना मजा आलीय. या सिनेमातील असे काही सीन आहेत की जे करताना मलाही हसू आवरत नव्हतं. हा सिनेमा कधी पाहताना मला मी दाबून ठेवलंलं हसू आठवतं. या सिनेमात एक सीन आहे.  पालवीचे वडील जे डॉन आहेत म्हणजेच दिनकर पाटील , पालवीचं प्रेम दगडूवर आहे हे कळल्यावर शांतारामच्या  घरी येतात तेव्हा दगडू आणि पालवीच्या नात्याविषयी त्यांचे बोलणे सुरु होत असते. मात्र बोलताना दिनकर पाटील एक एक करून  खिशातील पिस्तूल, सुरा असं एकेक हत्यार शांताराम समोर काढून ठेवायला सुरु करतात'.

भाऊ कदम पुढे म्हणाला,  'डॉन दिनकरची भूमिका करणारा संजय नार्वेकर हा सीन करत होता. त्याची ती भाईगिरीची भाषा, एकेक हत्यार समोर ठेवत बोलणं हे बघून खरंतर शांतारामला घाबरायचं होतं. पण माझ्यातील भाऊ हसायचं काही थांबेना. तो अख्खा सीन होईपर्यंत मी हसत होतो. जेव्हा कॅमेरा संजयकडे असायचा तेव्हा समोर मला हसू फुटत होतं. कॅमेरा माझ्याकडे आला की तेवढयावेळापुरता मी गंभीर लुक द्यायचो. आमचा हा सीन असा शूट झालाय. जेव्हा जेव्हा मी टाइमपास 3 बघतो किंवा या सिनेमाविषयी बोलतो तेव्हा मला या सीनच्या शूटचा किस्सा आठवल्याशिवाय राहत नाही'.

टाइमपास ३ मध्ये सुधारलेल्या दगडूच्या वडीलांच्या शांताराम परबच्या भूमिकेतील भाऊ कदमच्या भन्नाट अभिनयाची पर्वणी झी टॉकीज वाहिनीवर रविवारी २० नोव्हेंबरला दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता प्रदर्शित होणाऱ्या टाइमपास ३ या सिनेमाने मिळणार आहे. भाऊ कदमच्या चाहत्यांसाठी ही खुशखबर असून शांताराम परबचा हा अंदाज पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

First published:

Tags: Marathi cinema, Marathi entertainment, Marathi news, Time pass marathi movie