मुंबई 18 जुलै : कॉमेडी क्वीन भारती सिंग (Bharti Singh) सध्या तिच्या मुलाखतीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भारतीने आपल्या जीवनातील अनेक कठीण प्रसंगांच वर्णन या शोमध्ये केलं आहे. अभिनेता मनिष पॉलने (Manish Paul) त्याच्या नव्या शोचा पहिला एपिसोड प्रदर्शित केला आहे. तर या पहिल्या एपिसोडची गेस्ट ही कॉमेडियन भारती सिंग होती. ‘द मनीष पॉल पॉडकास्ट’ (The Manish Paul Podcast) असं या नव्या शोचं नाव आहे. भारतीने तिची कहानी सांगत म्हटलं की, “माझी आई दुसऱ्यांच्या घरी जेवन बनवायची आणि देवीसाठी कपडे शिवायची, ज्यामुळे घरात नेहमी शिलाई मशिनचा आवाज यायचा, मी 21 वर्षे या गोंगागाट काढले आहेत. मला पुन्हा तिथे परत नाही जायचं.”
पुढे भारतीने सांगितलं की, “माझी फार मोठी स्वप्न नाहीत पण मी देवाकडे प्रार्थना करते की माझ्याकडे जे काही आहे ते असच राहू दे. आम्ही मीठ आणि भाकरी खाल्ली आहे पण आता आमच्याकडे डाळ, भात, भाकरी सगळं काही आहे. मला आशा आहे की माझ्या परिवाराकडे कमीत कमी डाळ तरी खाण्यासाठी असेन. मी कधीच त्या स्थितीचा सामना करु इच्छीत नाही आणि माझ्या परिवारालाही करावा लागू नये.”
HBD: वडील मंत्री तर आई समाजसेविका, तरीही संघर्षात गेलं भूमी पेडणेकरचं बालपणभारती असंही म्हणाली की, “तिचा भाऊ एका दुकानात सामान विकायचा. तर तिची आई आणि बहीण एका कारखाण्यात चादरी शिवायच्या. घरी जाण्याचा मन व्हायचं नाही, इथेच कॉलेजमध्येच हॉस्टेल वर राहून जेवण खाण्याचा विचार करायची. मला माहीत होतं की एकदा परत गेलं की पुन्हा गरीबीत आणि लहानशा उजेडात जगांव लागणार.” आज भारतीची कॉमेडी क्वीन म्हणून केवळ भारतातच नाही तर देशाबाहेरही नाव आहे. याशिवाय भारती एक नॅशनल लेव्हची शुटर असल्याचही मनिषने सांगितलं होतं.