जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / मालिकेच्या सेटवर अभिनेत्री अक्षया नाईकच्या पायाला दुखापत, दोन पावलं चालणंही झालं कठीण

मालिकेच्या सेटवर अभिनेत्री अक्षया नाईकच्या पायाला दुखापत, दोन पावलं चालणंही झालं कठीण

मालिकेच्या सेटवर अभिनेत्री अक्षया नाईकच्या पायाला दुखापत, दोन पावलं चालणंही झालं कठीण

मालिकेच्या सेटवर अभिनेत्री अक्षया नाईकच्या पायाला दुखापत, दोन पावलं चालणंही झालं कठीण

सुंदरा मनामध्ये भरली मालिकेच्या सेटवर अभिनेत्री अक्षया नाईकच्या पायाला दुखापत झाली आहे. तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 जून: कलाकार हा नेहमीच कलेसाठी प्रामाणिकपणे काम करत असतो. पण एक वेळ अशी येते जेव्हा आपल्या जीवापेक्षा मोठं काहीच नसतं. असंच म्हणण्याची वेळ आलीय अभिनेत्री अक्षया नाईक ( Akshaya Naik) हिच्यावर. अक्षया म्हणजेच कलर्स मराठीवरील ( Colors Marathi) ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ( sundara manamadhe bharli)  मालिकेतील सर्वांची लाडकी लतिका ( Latika) अभिनेत्री अक्षया नाईकचा मालिकेच्या सेटवर अपघात झाल्यानं तिच्या पायाला दुखापत झाली आहे. पायाला दुखापत झाल्यानं अक्षयाला दोन पावलं चालणंही कठीण झालं आहे.  अक्षयानं सोशल मीडियावर पोस्ट लिहीत ही माहिती तिच्या चाहत्यांनी दिली आहे. अक्षयाच्या पायाच्या लिगामेंटला दुखापत झाली आहे. गेली काही दिवस अक्षया दुखऱ्या पायानं मालिकेचं शुटींग करत होती. पण दुखणं वाढत असल्यानं तिचा  त्रासही वाढला आहे त्यामुळे डाक्टरांच्या सल्ल्यानं अक्षयाला आराम करण्यावाचून पर्याय नाही. पायाच्या दुखण्यानं अक्षयाला चालणं कठीण झालं आहे. त्यामुळे सेटवर अक्षयाला व्हिलचेअरचा वापर करावा लागत आहे. अक्षयानं व्हिलचेअरवर बसलेला तिचा व्हिडीओ शेअर करत सविस्तर पोस्ट लिहीली आहे.

जाहिरात

अक्षयानं पोस्टमध्ये म्हटलंय, ‘The show must go on असं आपण सगळेच बोलतो, पण जीवापेक्षा मोठं दुसरं काही नाही.कलर्स मराठीचे मी आभार मानते की त्यांनी माझ्या प्रक्रूतिनुसार कथेत काही बदल करून मला आरामासाठी वेळ दिला. Ligament Tear असल्यामुळे सध्या आराम हाच उपाय आहे, बाकी डॉक्टर सांगतिलच. तुम्ही सुंदरा… बघत रहा कारण आपली भेट होतच राहिल टिव्हीवर . आमच्या डिरेक्शन टिम आणि क्रू मेंबर्सना मनापासून THANK YOU 🙏 And ofcourse the best co-actors that I’ve got’ हेही वाचा - VIDEO: पुन्हा लग्न करायला भीती वाटत होती पण… स्वप्निल जोशी सांगतोय त्याच्या सावित्रीची गोष्ट अक्षयाच्या पायाला झालेल्या दुखापतीनंतर चाहत्यांनी मात्र चिंता व्यक्त केली आहे.  अक्षयाच्या रिकव्हरीसाठी सगळ्यांनी प्रार्थना केली आहे.  एका चाहत्यानं म्हटलंय, ‘लवकर बरी हो आणि खूप रिल्स टाक, काळजी घे’, तर दुसऱ्या एका चाहत्यानं म्हटलंय, ‘अक्षया तु लवकर बरी होणार, तुझ्या फॅन्सचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत’. अक्षयानं याआधीही तिचे काही व्हिडीओ शेअर केले होते ज्यात तिच्या पायाला दुखापत झाल्याचं कळतं होतं. तिला चालण्यासाठी आधार घ्यावा लागत होता.  ‘वेलकम मान्सून विथ ब्रोकन लेग, रेस्ट जरुरी हे पर शो मस्ट गो ऑन’, असं म्हणतं अक्षयानं पायाला पट्टा लावून कूल स्टाइलमध्ये तिचा फोटो शेअर केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात