मुंबई, 1 ऑगस्ट : कलर्स मराठीवरील 'जीव माझा गुंतला' मालिकेने अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले. रिक्षावाली अंतरा आणि बीझनेस मॅन मल्हार यांची आगळीवेगळी गोष्ट प्रेक्षकांना पसंत पडली. परस्परविरोधी असे मल्हार आणि अंतरा लग्नबंधनात अडकल्यावर त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. नात्यांचा गुंता अधिकच वाढला. आतापर्यंत हे दोघेही एकमेकांचा पराकोटीचा द्वेष करत होते. सतत या दोघांचं भांडण व्हायचं. पण आता या दोघांचं नातं बदललं आहे. या दोघांच्या नात्यात द्वेषाची जागा एकमेकांविषयीच्या प्रेमाने घेतली आहे. आतापर्यन्त अंतरा आणि मल्हारने अनेक कठीण प्रसंगांना मोठ्या धिराने तोंड दिले. आता कुठे या दोघांचा सुरळीत संसार सुरु झाला आहे. आता अंतरा आणि मल्हारमध्ये प्रेमाचं नातं फुलत आहे. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत.
या दोघांनी अजूनपर्यंत एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिलेली नाही. पण आता (jeev majha guntala romantic track) मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. त्यामध्ये मल्हार अखेर त्याच्या अंतरावरील प्रेमाची कबुली देणार असे दाखवले आहे. इतके दिवस या दोघांचा या बाबतीत लपंडाव चालला होता. मात्र आता हे दोघे आपल्या प्रेमाची कबूली देणार असल्याचं दिसत आहे. अंतरा मल्हारकडून प्रेमाची कबुली ऐकण्यासाठी आतुरली आहे. आता मल्हार तिला ते प्रेमाचे तीन शब्द बोलून दाखवणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
View this post on Instagram
जीव माझा गुंतला मालिकेत मधल्या काळात अंतरावर अज्ञात व्यक्तीकडून हल्ला झाला होता. तिला या हल्ल्यातून मल्हारने वाचवले होते. तेव्हा मल्हारला अंतरावरील प्रेमाची जाणीव झाली होती. तेव्हापासून तो तिच्यासोबत नीट वागत होता, तिची काळजी घेत होता. आता हि दोघं एकमेकांवरच प्रेम कधी व्यक्त करणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. पण आता त्यांची प्रतीक्षा संपणार असं दिसतंय.
हेही वाचा- Sukh Mhanje Nakki Kay Asta : शिर्के-पाटलांच्या घरी येणार नवीन पाहुणा; गौरी देणार गुड न्यूज
कमी काळात प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेल्या या अंतरा आणि मल्हारच्या जोडीचे रोमँटिक क्षण येणाऱ्या काळात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. अंतरा आणि मल्हारची जोडी सर्वांची आवडती जोडी आहे. या दोघांच्यात भांडणात देखील यांच्यातील प्रेम दिसते. त्यामुळे आता त्यांचा सुखी संसार बघण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.