जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘मराठी चित्रपटांसाठी महाराष्ट्रात भीक मागावी लागते’; प्रसाद ओक संतापला

‘मराठी चित्रपटांसाठी महाराष्ट्रात भीक मागावी लागते’; प्रसाद ओक संतापला

‘मराठी चित्रपटांसाठी महाराष्ट्रात भीक मागावी लागते’; प्रसाद ओक संतापला

महाराष्ट्रात मराठी चित्रपटांसाठी भीक मागावी लागतेय अशी वेळ येईल असा विचारही केला नव्हता असं दु:ख त्यानं व्यक्त केलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 17 एप्रिल**:** मराठी चित्रपट दर्जेदार असतात. त्यामध्ये खूप चांगला अभिनय केला जातो. त्यांची मांडणी उत्तम असते अशी स्तुती वारंवार केली जाते. मराठी चित्रपटांना देश-विदेशातील अनेक पुरस्कारांनीही गौरवण्यात येतं. परंतु देखील मराठी प्रेक्षक आपल्या चित्रपटांकडे पाठ फिरवतात अशी खंत अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) यानं व्यक्त केली. महाराष्ट्रात मराठी चित्रपटांसाठी भीक मागावी लागतेय अशी वेळ येईल असा विचारही केला नव्हता असं दु:ख त्यानं व्यक्त केलं. लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत प्रसादनं मराठी चित्रपटांच्या सद्य परिस्थितीवर भाष्य केलं. तो म्हणाला, “गेल्या काही वर्षात मराठी चित्रपट प्रचंड प्रगती करतोय. निर्मात्यांनी आपलं तंत्र सुधारलं. नवनवे विषय हाताळले जात आहेत. अन् विशेष म्हणजे या चित्रपटांना जागतिक स्थरावर पुरस्कार मिळतायेत. तरी देखील मराठी प्रेक्षक चित्रपटांकडे पाट फिरवतोय. मराठी चित्रपट चालत नाही अशी ओरड करण्याआधी मराठी माणसानेच आधी विचार करण्याची गरज आहे. मराठी माणसंचं हिंदीला आधी प्राधान्य देतात. जर महिन्यात तुम्ही एक चित्रपट पाहत असाल तर पहिला विचार मराठी चित्रपटाचा का होत नाही? मग मराठी चित्रपटांना सिनेमागृह मिळत नाही किंवा ते चालत नाही याचा आरडाओरड करण्याला अर्थ नाही.” अवश्य पाहा - एका सलमानमुळं बदललं दुसऱ्या सलमानचं आयुष्य; संघर्ष ऐकून भाईजानही भावुक यापुढे तो म्हणाला, “सगळ्यात आधी मराठी माणसाने विचार करायला हवा की आपण मराठी सिनेमांना प्राधान्य देतो का? आणि जर प्राधान्य दिलं गेलं पाहिजे आणि राजकर्त्यांनीही याचा विचार केला पाहिजे. प्रत्येक सिनेमासाठी निर्माते आणि दिग्दर्शकांना स्क्रीनसाठी भिका मागाव्या लागतात ही अत्यंत लाजिरवाणी आणि लांच्छनास्पद गोष्ट आहे.” प्रसादनं मराठी चित्रपट चालत नाही याला प्रेक्षक देखील तितकेच जबाबदार आहेत असं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात