मुंबई 4 एप्रिल: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शशिकला जावळकर (Shashikala) यांचं निधन झालं आहे. त्या ८८ वर्षांचं होत्या. चार एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. (Veteran actress Shashikala passes away) आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर तब्बल दोन दशकं त्यांनी गाजवली आहेत. मुख्य अभिनेत्री, खलनायिका, आई अशा विविध प्रकारच्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. या अष्टपैलू अभिनेत्रीनं जवळपास 100 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शशिकला यांच्या निधनामुळं बॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Deeply saddened by the demise of Veteran actress Shashikala ji. She made a noteworthy contribution to Indian Cinema by portraying several pivotal roles. My heartfelt condolences to her family members. May her soul rest in peace #Shashikala #RIP pic.twitter.com/N5B7q62yls
— Praful Patel (@praful_patel) April 4, 2021
शशिकला या बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांनी साकारलेल्या खलनायिका देखील उच्च अभिनित असत. बॉलिवूडमधील अनेक नावाजलेल्या निर्माते आणि दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं आहे. प्रामुख्यानं त्यांचे ‘नौ दो ग्यारह’, ‘कानुन’, ‘जंगली’, ‘हरियाली और रास्ता’, ‘अनपढ’, ‘यह रास्ते हैं प्यार के’, ‘वक्त’, ‘देवर’, ‘अनुपमा’, ‘नीलकमल’, ‘तीन बहुरानियाँ’, ‘हमजोली’, ‘सरगम’, ‘क्रांती’, ‘रॉकी’, ‘बादशहा’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘चोरी चोरी’ हे चित्रपट सुपरहिट ठरले होते. 2005 पर्यंत त्या सिनेसृष्टीत कार्यरत होत्या. परंतु पुढे वाढत्या वयामुळं त्यांनी अभिनयातून निवृत्ती स्विकारली. शशिकला यांच्या निधनामुळं बॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. जगभरातील अनेक चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.