मुंबई, 8 फेब्रुवारी- मराठीतील आघाडीच्या कलाकारांपैकी एक अशी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता प्रसाद ओकची ओळख आहे. सई आणि प्रसाद नेहमीच आपल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळे चर्चेत असतात. दरम्यान हे दोघे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. या दोघांनी हात जोडून हास्यजत्रेमधील स्पर्धक आणि अभिनेत्री वनिता खरातची माफी मागितली आहे. पाहूया नेमकं काय घडलंय. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमात अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता प्रसाद ओक परीक्षकाची भूमिका पार पाडत आहेत. या शोमुळे दोघेही सतत चर्चेत असतात. सई आणि प्रसाद शोमधील स्पर्धकांच्या फारच जवळ आहेत. या दोघांचं स्पर्धक कलाकरांसोबत फारच छान बॉन्डिंग आहे. सतत हे कलाकार स्पर्धकांसोबत मजामस्ती आणि धम्माल करत असतात. सोशल मीडियावर या शोबाबत अनेक पोस्टसुद्धा शेअर करत असतात. अशातच दोघे वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. **(हे वाचा:** Maharashtrachi Hasyajatra फेम वनिता खरातचा लग्नात झक्कास उखाणा; ऐकून तुम्हीही म्हणाल क्या बात… ) सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक हे दोघेही चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरदेखील प्रचंड लोकप्रिय आहेत. दोघेही सतत सोशल मीडियावर सक्रिय असतात. या कलाकारांच्या पोस्ट नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतात. अशातच आता दोघांनी एक नवी पोस्ट शेअर केली आहे. या दोघांच्या नव्या पोस्टची सध्या जोरदार चर्चा होत आहे. कारण सई आणि प्रसादने या पोस्टच्या माध्यमातून हात जोडून स्पर्धक वनिता खरातची माफी मागितली आहे.
का मागितली माफी? सई ताम्हणकर आणि प्रसाद ओकने वनिता खरातची माफी का मागीतली? असा प्रश्न सर्वानांच पडलेला आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, सई ताम्हणकर आणि प्रसाद ओकने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये वनिता रुसून बसलेली दिसून येत आहे. तर प्रसाद ओक, सई ताम्हणकर आणि इतर सदस्य तिची हात जोडून माफी मागताना दिसून येत आहेत. या दोघांनी वनिताच्या लग्नात हजेरी लावता न आल्याने तिची माफी मागितली आहे. वनिताने हास्यजत्रेच्या संपूर्ण टीमला निमंत्रण दिलं होतं. पूर्ण टीम उपस्थित होती. परंतु प्रसाद आणि सई मात्र उपस्थित राहू शकले नव्हते.
वनिता खरात बोल्ड आणि बिनधास्त फोटोशूटमुळे प्रचंड चर्चेत आली होती. काहींनी तिचं कौतुक केलेलं तर काहींनी तिच्यावर प्रचंड टीका केली होती. दरम्यान वनिता खरात २ फेब्रुवारीला लग्न बंधनात अडकली आहे. हास्यजत्रा टीमचाच एक भाग असलेल्या सुमित लोंढेसोबत वनिताने लग्न केलं आहे. या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती.