मराठीतील चंद्रमुखी अर्थातच अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
आज अभिनेत्री आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. पाहूया अभिनेत्रीच्या वैवाहिक आयुष्यात काय सुरु आहे.
अमृता खानविलकर नुकतंच एका टॉक शोमध्ये सहभागी झाली होती. यामध्ये तिच्यासोबत 'आदिपुरुष'चा दिग्दर्शक ओम राऊतसुद्धा उपस्थित होता.
यावेळी अमृताला असा प्रश्न विचारण्यात आला होता की, तू कित्येकदा आपल्या नवऱ्याला सोशल मीडियावर ब्लॉक, अनफॉलो करतेस? हे खरं आहे का?
मात्र या मुलाखतीनंतर अमृता आणि हिमांशूमध्ये काही बिनसलं आहे का? त्यांचं भांडण झालंय का? अशा चर्चा सुरु आहेत.
अमृता खानविलकरने हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेता हिमांशू मल्होत्रासोबत २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली आहे.