जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Pradeep Patwardhan: 'मराठी कलासृष्टीने उमद्या कलावंताला गमावलं'; मुख्यमंत्र्यांसह राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

Pradeep Patwardhan: 'मराठी कलासृष्टीने उमद्या कलावंताला गमावलं'; मुख्यमंत्र्यांसह राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

Pradeep Patwardhan: 'मराठी कलासृष्टीने उमद्या कलावंताला गमावलं'; मुख्यमंत्र्यांसह राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या निधनानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 09 ऑगस्ट: मोरुची मावशी हे नाटक अजरामर करणारे मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. मुंबईच्या गिरगावात वास्तव्यास असलेल्या प्रदीप पटवर्धन त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यानं मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. नाटक, मालिका ते सिनेमा अशा तिन्ही माध्यमांवर प्रदीर पटवर्धन यांनी आपला ठसा उमटवला होता. त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सिनेसृष्टीसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रदीप पटवर्धन यांना श्रद्धांजली वाहत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी कलासृष्टीने उमद्या कलावंताला गमावलं अशा शब्दांत दुख: व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत म्हटलंय, ‘मराठी रंगभूमीवरील मोरूची मावशी, बायको असून शेजारी, लग्नाची बेडी तसेच मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे सदाबहार अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी कलासृष्टीने उमद्या कलावंताला गमावले आहे’.

जाहिरात

हेही वाचा - ‘मी त्यांना बघून घाबरून पळून आले’; प्रदीप पटवर्धनांच्या निधनानंतर हेमांगीनं भावुक होत सांगितली ती आठवण मुख्यमंत्र्यांसह खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रदीप पटवर्धन यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या कुटुंबियांप्रती भावना व्यक्त केल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हटलंय, ‘ज्येष्ठ अभिनेते प्रदिप पटवर्धन यांच्या निधनामुळे रंगभूमीवरील एक हसरा-खेळता अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला. त्यांनी ‘मोरुची मावशी’ यांसारख्या नाटकांमध्ये भूमिका साकारल्या. याशिवाय एक फुल चार हाफ, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय,गोळा बेरीज अशा अनेक चित्रपटांतून देखील भूमिका साकारल्या’. प्रदीप पटवर्धन यांच्या निधनानंतरही त्यांच्या भूमिका रसिकांच्या कायम स्मरणात राहतील असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

त्याचप्रमाणे मंत्री धनंयज मुंडे यांनीही प्रदीप पटवर्धन यांच्या निधनावर दुख: व्यक्त करत त्यांच्या अकाली निधनाने मराठी रंगभूमीतला एक हसरा चेहरा निवर्तला अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

जाहिरात

प्रदीप पटवर्धन यांनी अनेक मालिका नाटक सिनेमात कामं केली. मात्र रंगभूमीवर त्यांनी निर्माण  केलेली त्यांची वेगळी ओळख कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. प्रदीप पटवर्धन, विजय चव्हाण आणि प्रशांत दामले यांच्या दमदार अभिनयानं मोरुची मावशी या नाटकानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. काही वर्षांआधीच अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन झालं. त्यानंतर आता प्रदीप पटवर्धन यांनी जगाचा निरोप घेतला. मोरूची मावशी नाटकातील दोन हरहुन्नरी कलाकारांच्या एक्झिटमुळे सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात