जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / महाराष्ट्रात शुटींगला परवानगी; नियमांत शिथिलता आणून चित्रिकरण होणार सुरू

महाराष्ट्रात शुटींगला परवानगी; नियमांत शिथिलता आणून चित्रिकरण होणार सुरू

महाराष्ट्रात शुटींगला परवानगी; नियमांत शिथिलता आणून चित्रिकरण होणार सुरू

शनिवारी राज्यसरकारने घोषणा केली की मुंबई आणि ठाणे याठिकाणी बायो बबलच्या (Bio bubble) माध्यमातून शुटींग केलं जाऊ शकतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 6 जून: कोरोनाच्या  (Corona) या संकटात अनेक क्षेत्रांना लॉकडाउनचा फटका बसला. त्याचप्रमाणे सिनेसृष्टीलाही मोठं नुकसान सहन कराव लागलं. अनेक चित्रपटाचं चित्रिकरण, प्रदर्शन रखडलं गेलं, यासोबतच संपूर्ण कामकाज हे ठप्प झालं. मागच्या वर्षीचा अनुभव घेता अनेक मालिका निर्मात्यांनी महाराष्ट्रातील लॉकडाउन (Lockdown) पाहता राज्याबाहेर शुटींग करणं पसंत केलं. पण आता राज्यात नियम शिथिल करून पुन्हा चित्रकरण सुरू होणार असल्याचं समजत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांच्यासोबत याविषयी एक महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याचही समजतं आहे. शनिवारी राज्यसरकारने घोषणा केली की मुंबई आणि ठाणे याठिकाणी बायो बबलच्या (Bio bubble) माध्यमातून शुटींग केलं जाऊ शकतं. पण केवळ 8 तासच शुटींगला परवानगी दिली जाणार आहे.

HBD: 10 व्या वर्षी केली करिअरची सुरूवात; निवेदिता सराफ कशा झाल्या लोकप्रिय अभिनेत्री?

FWICE चे अध्यक्ष बी एन तिवारी म्हणाले की, “इतरवेळी आम्ही 12 तास काम करतो पण याविषयी आम्ही राज्यशासनाशी चर्चा करत आहोत. मुंबई आणि ठाण्यात शुटींगला परवानगी मिळाली आहे. काही निर्माते हे राज्याबाहेर शुटींग करत आहेत. तेथील काम संपवून लवकरच ते राज्यात परततील.”

जाहिरात

पुढे ते म्हणाले की, “पाऊस आणि तोत्के (Taukte) वादळामुळे काही सेट्सचं नुकसान झालं आहे त्यांच्या नियोजनाचं काम सुरू आहे, त्यांनी सांगितलं की संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्यांना शुटींग संपवाव लागणार आहे. तसेच बायो बबलचं पालन करून शुटींग केलं जाईल. फिल्म आणि टेलिव्हिझन उद्योगाने एक लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत सेटवरील सगळ्या कर्मचाऱ्यांच लसीकरण करण  अनिवार्य असेल.” त्यामुळे आता लवकरच शुटींग पुन्हा मुंबईत सुरु होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात