HBD: 10 व्या वर्षी केली करिअरची सुरूवात; निवेदिता सराफ कशा झाल्या लोकप्रिय अभिनेत्री?
अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांचा प्रेरणादायी अभिनय प्रवास.
|
1/ 10
मराठी सिनेसृष्टीतील एक लाडकी नायिका म्हणजेच अभिनेत्री निवेदिता जोशी- सराफ. निवेदिता यांनी आजवर अनेक वर्षे प्रेश्रकांच्या मनावर राज्य केलं तर अजूनही करत आहेत. पाहा कसा होता त्यांचा अभिनय प्रवास.
2/ 10
निवेदिता सध्या अग्गबाई सुनबाई या मालिकेतून प्रेक्षकांच मनोरंजन करत आहेत.
3/ 10
मालिकेचं पहीलं पर्व विशेष लोकप्रिय ठरंल होतं. तर आता दुसऱ्या पर्वालाही चांगली पसंती मिळत आहे.
4/ 10
निवेदिता यांनी बालकलाकार म्हणून अवघ्या वयाच्या १० व्या वर्षा आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. अपनापण हा हिंदी चित्रपट त्यांचा पहिला चित्रपट होता.
5/ 10
नवरी मिळे नवऱ्याला हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता. 1984 साली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
6/ 10
या नंतर त्या अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटांतही झळकल्या होत्या.
7/ 10
1990 मध्ये निवेदिता यांनी अभिनेते अशोक सराफ यांच्याशी विवाह केला. त्यांना अनिकेत सराफ नावाचा मुलगा आहे.
8/ 10
90 च्या धसकात त्या अनेक सुपरहिट चित्रपटांत झळकल्या. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर त्यांनी गारुड केलं होतं.
9/ 10
धुम धडाका, दे दनादन, अशी ही बनवाबनवी, बाळाचे बाप ब्रम्हचारी असे अनेक सुपरहिट चित्रपट त्यांच्या नावावर आहेत.
10/ 10
निवेदिता यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.